असे नव्हे की मी
प्रेम केलेच नाही
केले खूप केले
रंगाच्या काळजावर प्रेम केले..
असे नव्हे की मी
तारुण्य भोगलेच नाही
भोगले खूप भोगले
कष्टाच्या काव्यात
तारुण्य कोरले
असे नव्हे की मी
प्रेमात हरविलो नाही
हरविलो खूपदा हरविलो
भुकेच्या प्रेमात रोज हरविलो
असे नव्हे की मी
प्रेमात सुखावलो नाही
सुखावलो खूप सुखावलो
पै पै जोडता उन्हात रंगलो
असे नव्हे की मी
मिठीत नाही शिरलो
शिरलो मिठीत शिरलो
कायम वेदनेच्या मिठीत शिरलो
असे नव्हे की
मी चुंबन नाही घेतले
घेतले चुंबन घेतले
थकल्या हातांचे चुंबन घेतले..
असे नव्हे की मी
प्रेमात वाहवत गेलो
गेलो वाहवत गेलो
थेट समुद्राला जाऊन भिडलो..

— रचना : चित्रकार विजयराज बोधनकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
