आपण समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन समाजातील सर्व सबळ घटकांनी वंचित, उपेक्षित लोकांसाठी झटले पाहिजे , असे आवाहन रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ.भरत वाटवानी यांनी नुकतेच केले.
ते नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात कै. प्रा.थोरात व्याख्यानमालेचे १३ वे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी
त्यांनी कर्जत येथील त्यांच्या श्रद्धा फाउंडेशन द्वारे रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी सुरू असलेले कार्य देशातच नाही तर विदेशातही कसे पसरले आहे याचीही माहिती दिली.
आता थांबायच नाय !
नाका कामगार व कचरा वेचक महिला यांच्यासाठी प्रभातने “आता थांबायचं नाय” या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला होता. या चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचरा वेचक महिलांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा मनोदय व्यक्त केला त्याला प्रतिसाद देत स्त्रीमुक्ती संघटना व प्रभात ने “आता थांबायचं नाय” हा अभ्यास वर्ग सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत यावर्षी १७ नंबरचा अर्ज भरुन १५ कचरा वेचक महिला दहावीची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचा सन्मान आता थांबायचं नाय हा चित्रपट यांच्या जीवनावरती आधारित आहे अशा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त उपायुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ZTCC मुंबई संलग्न संस्था प्रभात ट्रस्ट अवयवादान प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहे. यासाठी स्मृतीव्याख्यान कार्यक्रमामध्ये सन २०२५ सालातील देशातील पहिले अवयवदाता, कोपरखैरणे येथील कै.देवानंद मोहन शिंदे( देबू) यांच्या परिवारास अवयवदाता सन्मान तसेच अवयदान क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी नवी मुंबईतील दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉ. कैलास जवादे यांना स्टार ऑफ द इयर सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सीकेटी कॉलेज न्यू पनवेल चे ग्रंथपाल डॉ.रमाकांत अमर नवघरे यांना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रभात संस्थेच्या कार्याची माहिती देणारी प्रभात दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संजीवजी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले व थोरात सरांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रभातच्यावतीने साकारण्यात आलेली बीज मोदक रंगावली व पुस्तकांचे थ्री आर अर्थात महानगरपालिकेतील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केलेला पुनर्वापर या उपक्रमाबद्दल प्रभातच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अवयवदाता दूत ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी विविध महाविद्यालयातील एनएसएस च्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये क्यू आर कोड च्या माध्यमातून करावयाचे अवयदान संकल्प त्याची प्रात्यक्षिक, नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कलच्या वासंती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य, तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केलेले गेले. या ठिकाणी बाबा आमटे यांच्या आनंदवन व प्रभात महिला बचत गट हस्त निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभातचे अध्यक्ष डॉ. प्रशांत थोरात यांनी केले .याप्रसंगी संस्थेचा या वर्षातील कार्याचा आढावा व भविष्याचा वेध त्यांनी घेतला तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य प्रताप महाडिक यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर समारोप राष्ट्रगीताने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्मृती व्याख्यान संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.
या प्रसंगी सामाजिक वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
