ठाण्यातील कवी, चित्रकार श्री रामदास खरे यांच्या ‘साईड इफेक्ट्स’ या अठराव्या पुस्तकाचे आणि दुसऱ्या गूढकथा संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पुण्याच्या ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बुक क्लब मेळाव्यात ज्येष्ठ लेखक, संपादक श्री भानू काळे यांचे हस्ते संपन्न झाले. हा गूढकथा संग्रह डिम्पल पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार, लेखक सारंग दर्शने, ज्येष्ठ लेखक, ग्रंथप्रेमी नितीन वैद्य, ज्येष्ठ लेखिका लीना पाटणकर, लेखक, ग्रंथप्रेमी राजीव श्रीखंडे आणि लेखक दिलीप फलटणकर उपस्थित होते.
व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी पुस्तकांचे महत्व, वाचन चळवळ, तरुणांचा सहभाग, ग्रंथमहोत्सवाचे प्रयोजन यावर आपले मौलिक विचार प्रकट केले.
लेखक रामदास खरे यांनी आपल्या मनोगतातून कविता लेखनाचा प्रवास सुरु असताना २००९ मध्ये अचानकपणे गवसलेली गूढकथा लेखनाची वाट पुढे कशी रुंद झाली हे विषद केले.
ज्येष्ठ कवी हेमंत जोगळेकर यांच्या कविता वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्यास बुक क्लबचे अनेक सदस्य जे साहित्यिक, पत्रकार, प्रकाशक, संपादक, समीक्षक, चित्रकार, वाचक-रसिक आहेत ते आवर्जून उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
