उद्या गाडगेबाबा पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.
गाडगेबाबाना विनम्र अभिवादन.
— संपादक
गाडगे बाबा आपले
किर्तन मधूर चांगले
सामान्य जन सगळे
किती सहजते गुंगले
भाषा बोली व-हाडी
शब्द शब्द ते कळले
बाबाकसे आपणाशी
नाते हळूवार जुळले
का शिकावे मानवाने
सार्थ समर्थ समजले
सावकारी कर्ज वाईट
कारण छान उमजले
जाती भेद क्रुर रूढी
कुंपण मोडुन काढले
गाव गल्ली न् मोहल्ले
स्वच्छ लख्ख झाडले
मन सुध्दा साफ केले
मित्र असंख्य जोडले
आपणचं करू सुधार
कर्तव्य आपले ताडले
गाडगेबाबा मना मना
सर्वत्र तुम्हांस पाहिले
देव खरचं माणसात
हृदय सुखात न्हाहिले
आठव होता बाबांची
चित्तइतिहासा धावले
कालातीतअमूल्यधन
भविष्यास ही भावले

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
