मी कोण कोणाचा ?
धरित्रीला येती विचार
माणूस म्हणून जन्मलो
माते मीच आहे आधार
कृतज्ञता व्यक्त करण्या
कर्तव्याचे मनी संस्कार
गीता देते तत्वज्ञान
कृष्णाचे ऐकावे विचार
मी पण अहंभाव जेथे
तेथे संपला मानव धर्म
मुखी नाही राम नाम
त्याचे वृथा ठरते कर्म
मीपण हेरगिरी करोनी
आयुष्य जाते वृथा
राक्षस वृत्ती जागवून
मानव घडलासे फुका
संत सज्जन सुसंगत
सद्विचार अन् संस्कृती
भाग्य ठरते त्या मातीचे
त्यात नसो कदापि तृटी
दांभिकता अवरूढींना
देऊन पहा तिलांजली
रक्त सळसळते राहो
हेच विचार घे ओंजळी
मी मी करून बकरा
संचारतो का देहांतरी
सारे येथेच सोडून जाशी
अंती भेटेल का हरी ?….

— रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
