महापालिकेच्या निवडणुकांचा
बिगुल वाजला गड्या
गल्ली बोळातल्या नेत्यांनी
पाहा मारल्यात कशा उड्या
याच निवडणूकासाठी आता
नेते फिरती गल्लोगल्ली
संधी कुठेही मिळताच
उडवतात एकमेकांची खिल्ली
आता करून रातीचा दिवस
राळ प्रचाराची उडवली
कार्यकर्त्यांच्या लगबगीने
सभा रंगतदार झाली
आश्वासनांची खैरात बघा
नेते घोषणा करती जोशात
खिरापती वेळी विचार करा
निधी आहे का कोषात?
आचारसंहिता निवडणुकांची
कोणी घेईना लक्षात?
मग नाराज कार्यकर्त्यांना
नेते प्रवेश देताती पक्षात
साम, दाम, दंड, भेद
नसे कुणालाही वर्ज्य
फोडाफोडीचे राजकारण
हेच दिसते त्यांचे लक्ष
समाजकारण सोडून
सारेच राजकारणात गुंतले
कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीत
नेते धन्यता मानु लागले
गड्या युपी बिहार पेक्षाही
नितीमत्ता किती खालावली
कोण होतास तू ,काय झालास तू?
अशीच म्हणण्याची वेळ आली !

— रचना:राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
