नाटककार, लेखक तथा निवृत्त माहिती संचालक श्री प्रल्हाद जाधव यांच्या ‘अंबे गोंधळाला ये!’ या अलीकडच्या नाटकाचा प्रयोग राज्य नाट्य महोत्सवात ‘सचिवालय जिमखान्या’तर्फे ‘साहित्य संघ मंदिर’ गिरगाव येथे २९ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता होत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सुगत उथळे यांनी केले असून मंत्रालयात विविध विभागात विविध पदांवर काम करणाऱ्या नाट्यप्रेमी कर्मचाऱ्यांनी त्यात भूमिका केल्या आहेत.

जाधव यांच्या ‘एक कप चहासाठी’ या नाटकाचा एक प्रयोग ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या स्पर्धेत याच महिन्यात (पंधरा डिसेंबर) अकोला केंद्रावर झाला. कोल्हापूर येथे परिवहन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे नाटक बसवले आहे. याच नाटकाचा आणखी एक प्रयोग कामगार कल्याण केंद्र कागल यांच्यामार्फत जानेवारीमध्ये कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर होत आहे. यंदाच्या राज्य नाट्य महोत्सवात हिंदी विभागात त्यांच्या ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ (शेवंता जिंती हाय!) या नाटकाचा प्रयोग मुंबईत होत आहे. रत्नागिरी येथील ‘सुमती थिएटर्स’ या संस्थेमार्फत तो सादर होत आहे. त्याचे दिग्दर्शन लक्ष्मीकांत शंकर भाटकर करीत आहेत.

‘विठु माझा लेकुरवाळा’ हे जाधवांचे नाटक रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथे ‘श्रीदेव रामेश्वर महाशिवरात्री महोत्सवात’ तेरा फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. हा प्रयोग गावखडी येथील ‘श्रीसिद्धिविनायक नाट्य मंडळा’सादर करीत आहे.

न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे श्री प्रल्हाद जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
