1. एक रोपटे
एक रोपटे लाविले द्वारी
जीव त्यावरी जडला,
जल देऊनी त्या वाढवला
मम अंतरी तो सुखावला…
कोवळे कोंब डोकु लागले
नाजूक कोंब ही तरतटले
फांदी जोर ती घेऊ लागली
अन् नव्याने बहरू लागली
कोमल कलिका उमलली
नव वधू परी बहरून आली
आधार वृक्षीचा शोधू लागली
रोऊनी आधार वेल बहरली
बिलगुनीया वृक्षाते सजली
नाते अलौकिक निसर्गे जडली
जणू मूक संमती एकमेका
हे जीवन वेला परि जगावे.
2. वावटळ
आली आली घोंगावत आली
चुंबूनीया धरणी आकाशी उडाली…
वावटळ किती थयथयली
अन् धुराळा उडवित गेली……
जराशी, अवनी थरथरली
क्षणिक ती ही बावरली
कवेत सारी दडपून होती,
काही वावटळी संगे गेली….
दुरवर वावटळीने धूळधाण केली
भीषण विराणता चहूकडे पसरली
………वावटळ …….
आली आली घोंगावत आली
चुंबूनीया धरणी आकाशी उडाली…
वावटळ किती थयथयली
अन् धुराळा उडवित गेली……
जराशी, अवनी थरथरली
क्षणिक ती ही बावरली
कवेत सारी दडपून होती,
काही वावटळी संगे गेली….
दुरवर वावटळीने धूळधाण केली
विराणता चहूकडे पसरली
3. आई
शब्दच सारे अपुरे पडती
तव काय लिहु ग मी आई !!
सुखद प्रेमाचा वर्षाव करुनी,
पाठी उभी होतीस आई
बाल संगोपन संस्कारी केलेस
स्मरणात अजुनी तू आई
निर्व्याज मोल त्या प्रेमाचे
हे, नच पांग फेडता येई
फणफणता ज्वर मांडीवर घेशी
रात्र रात्र अश्रुंनी भिजविशी
झुरलीस ग लेकरासाठी
तळमळ तुझी माये पोटी…
संस्कारी मज तू केले,
विश्वची साक्षी झाले
मग, सांग ना ग आई,
आता होऊ कशी उतराई ?
पूज्यनीय माझी माता
ही वात्सल्यमूर्त देवता
प्रेम ओलावा भरलेली ममता
ठेव आशिष हा या, मम माथा

— रचना : सुप्रिता यंदे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Suprita yande madam च्या कविता खुप छान हृदयाला भिडणाऱ्या