“आमच्यासारखे आम्हीच”
मंडळी,
Surrealism हा चित्रप्रकार जितका स्वप्नवत असतो, तितका तो गूढही असतो. त्यामुळे René Magritte हयांनी काढलेल्या चित्रांमध्ये ती गूढता आपल्याला प्रकर्षाने जाणवते. René Magritte यांच्या “The Lovers” या चित्रात दोन व्यक्तींचं प्रेम दाखवलं आहे — पण त्यांच्या चेहऱ्यांवर एक अस्पष्ट, अपारदर्शक कापड आहे. हे प्रेम गूढ आहे, दडपलेलं आहे, आणि तरीही त्यात एक अनोखी ओढ आहे.
हे चित्र पाहताना मला जाणवलं — की बऱ्याचदा आपणही अशाच पद्धतीने प्रेम करतो आणि जगतो — ओढून ताणून, ओढण्याआड लपवून आणि भावनांना मुखवट्याआड ठेवून…
ही कविता कुणा “प्रेमी युगुलांबद्दल” नाही — तर प्रेमाच्या अवस्थेबद्दल आहे, जी अनेकदा मुखवट्याआडून दिसते, पण आतून तितकीच खरी आणि तीव्र असते. अशा अस्तित्वाच्या नकळत घुसमटीतून उमटलेला आतला आवाज म्हणजेच — “आमच्यासारखे आम्हीच.” यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन’: देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
