नुसता शब्द नव्हे हा आई,
प्रेमळ हृदय, करुणामय ती आई,
मातृत्वाचे लेणे लेऊन
बाळाला कडेवर घेऊन
चिऊ, काऊ चा घास भरून,
बाळा वीण तिज सुचेना काही
असते फक्त तीच आई,
बाळाला सांभाळीत ती करते सर्वांचा आदर
कामासाठी गाडीत चढताना सांभाळीत पदर,
तान्हुळ्याची भूक भागविन्यास
सारिते बाजुला तोच पदर
असते फक्त तीच आई,
बालपणी ती हात देई
तरुणपणी ती साथ देई
रणांगणी ती स्फुरण देई,
वाढविण्या मुला, मायेचे पाश तोडी,
संकट समयी आधार देई,
असते फक्त तीच आई
असते फक्त तीच आई.

— रचना : सौ सुजाता सातालकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800

क्या बात है सुजाताजी ! . खुपच बोधप्रद अशी आईची महती वर्णन करणारी तुमची अप्रतिम कविता वाचुन खुपच आनंद झाला . त्यामुळे तुमच्यामध्ये अंगभूत कवियत्रीचा अविष्कार असणारे गुण असल्याची वाचकांना अगदी प्रकर्षाने जाणीव होईलच . तुम्ही असाच स्वतःचा कविता संग्रह तयार करावा ह्यासाठी मी तुम्हाला तसेच तुमच्या साथीदारांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो . तुम्ही अशाच कविता करत रहाव्यात म्हणजे आम्ही वाचकपण रसिकतेने त्या वाचत राहू . पुनश्च एकदा तुमच्या सर्व टीमला तुमच्यासह हार्दिक शुभेच्छा !
छान कविता सुजाता साताळकर ह्यांची 👌🏻👌🏻