चिरंजीव नाही जगती मरण माणसाचे
जरी तरी जावे लागे अंत या जीवाचे
व्यर्थ काय माया लावित शरीर उधारीचे
कोण बहीण कोण भाऊ नाही हे कुण्णाचे
आपणास जावे लागे लिखित ईश्वराचे
नको उगा अश्रु ढालू सार संचिताचे
का उगा करिशी चिंता उद्याची
स्वप्न का तू पाहशी सुखाची
धावणारा जीव तुरे आपुल्या हाती
काही ना उरे
सुख म्हणता दुख येइरे
जे जे होइल ते पाहणारे
आज ना घडले ते उद्या होणार
आजचे मरण उद्या ना टळणार
सर्व काही तोच करणार
तोच मारणार अन तोच तारणार

– रचना : मोहनदास मुंगळे
