आई मला छोटीशी गिटार देना
गिटार घेईन गाणी मी गाईन
मित्रांना छान छान शिकवीन
अनाथ मुलांना बोलवीन
आई मला छोटीशी कार देना
कार मी भरभर चालवीन
आजारींना नेईल पटकन
मदतीला मित्रांना बोलावीन
आई मला खूप खेळणी घेना
खेळणी घेऊन अपंगांना देईन
लहान लहान वस्तू शिकवीन
त्यांना स्वावलंबी करीन

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
