Friday, October 18, 2024
Homeबातम्याकोकण : मदतीसाठी मार्गदर्शक सूचना

कोकण : मदतीसाठी मार्गदर्शक सूचना

कोकण विभागात 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पुरामुळे बाधित शहर आणि गावांमध्ये लोकांना अत्यावश्यक व जीवनावश्यक साहित्य वाटपाबाबत कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.व्ही.बी.पाटील यांनी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

दानशूर व्यक्ती,संस्था,एनजीओना मदत करण्याची इच्छा आहे, त्यांनी पुढीलप्रमाणे आवश्यक साहित्यांची मदत करावी.
तांदूळ, गहू पीठ, कडधान्य
(मूग/ तुरडाळ/ मटकी/ वटाणे/चणे/चवळी इत्यादी), गोडेतेल, मीठ, खोबरं, शेंगदाणे, मसाला, तिखट, हळद पावडर, मिरची पावडर, साखर, चहापावडर, दूधपावडर, कांदे, बटाटे, लसूण तसेच कपड्यांमध्ये अंथरुण, बेडशीट, चादर, अंतरवस्त्र, बनियान, पॅन्ट, अंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण, टुथपेस्ट, माचीस, मेणबत्त्या.

एका कुटूंबाच्या गरजेनुसार वर नमूद वस्तूंचे एकत्रित कीट तयार करण्यात यावे. खाद्यानांचा दर्जा योग्य असेल याची दक्षता घ्यावी. खाद्यान्न देतांना मुदतबाह्य/किडलेले/सडलेले अथवा खाण्यास अयोग्य असे पदार्थ देण्यात येऊ नये.
कोणत्याही परिस्थितीत जीर्णवस्त्र व वापरण्यास अयोग्य फाटक्या कापडी वस्तूंचे जसे चादरी, कांबळाचे वाटप करू नये.
एनजीओ/दानशूर व्यक्ती/संस्थांनी रोख रक्कमेचे वाटप करू नये. रोख रक्कम स्विकारण्यात येणार नाही. एनजीओ, संस्था ,दानशूर व्यक्ती यांनी धनादेश (Cross Cheque) अथवा धनाकर्ष (Demand Draft किंवा RTGS द्वारे मदत करण्यास हरकत नाही.

रत्नागिरी जिल्हयातील पुरग्रस्तांसाठी खात्याचे नांव-रत्नागिरी डिस्ट्रिक्ट रिलिफ फंड (Ratnagiri District Relief Fund)
खाते क्र.146310110018443
(बँक ऑफ इंडिया)
शाखा – मारुती मंदिर, रत्नागिरी.
IFSC Code – BKID0001463.

रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांसाठी खात्याचे नांव- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund)
खाते क्र.- 38222872300
(स्टेट बँक ऑफ इंडिया)
शाखा – मुख्य शाखा, अलिबाग.
IFSC Code – SBIN0000308.

इच्छुकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे अशा पॅकबंद वस्तूंचे वाटप करण्यास हरकत नाही.

रायगड जिल्हयासाठी समन्वय अधिकारी म्हणून,
जिल्हा पुरवठा अधिकारी :- मधूकर बोडके
9965100800                      आणि   
रत्नागिरी जिल्हयासाठी उपजिल्हाधिकारी
श्रीमती अमिता तळेकर, 9423034070/9307449021 यांना संपर्क साधावा.

गरजू, पुरबाधित नागरिकांना मदत करतांना शक्य तो फोटो काढण्यात येऊ नये. फोटो काढावयाचा झाल्यास गरजू, पुरबाधित नागरिकांच्या आत्म सन्मानाची जाणीव ठेवण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

– मूळ स्रोत : वि मा का, कोकणभवन
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. हीच वेळ आहे, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याची, आणि ते मार्गदर्शन तुम्ही सर्वां समोर आणलेत. धन्यवाद सर! हा संदेश मी पुढे पाठवत आहे.

  2. अतिशय चांगला उपक्रम! मी हे अनेकांना फॉरवर्ड केले आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन