शब्दांच्या पाकळ्यातून गंध
उलगडावे फुलांचे
प्रीत असता हृदयी जपावे
नाते भावनांचे
ओंठावरती शब्द असावे
तुझ्याच नावाचे
स्वप्नही पडावे अपुल्या
प्रितीच्या गावाचे
काळोख्या रात्री
भय का तुला हरवण्याचे
बघ अपुल्याच साठी
थवे त्या चांदण्याचे
अंगणी बसावे न्याहाळीत
आकाश चांदण्याचे
नकळत न शोधता मिळणार
रस्ते त्या मनांचे
मग कशास आता मनावर
रंग ते भितीचे
सत्यात येऊनी स्वप्न,
बहरेल रोप ते प्रितीचे
– रचना : राजेंद्र पुरव.