रायगड जिल्हा हा क्रीडाप्रेमींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यात खालापूर येथे नुकतेच अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल पंच शिबीर आयोजित करण्यात आले होते.
रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबाल व खालापूर तालुका व्हॉलीबॉल असोसिएशन तर्फे आणि पार्ले बिस्कीट कंपनीच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉलचे अध्यक्ष बिपीन कुमार म्हणाले की,
पंचाने काम करत असताना आदर्शवत व निपक्ष:पाती काम करावे. पंचाना माहिती देताना बिपीन चहल म्हणाले की, डायरेक्ट हॉलीबॉल हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा कसा आहे, हे सांगून खेळाचे नियम साधे व सोपे आहेत, म्हणून पंच व सर्व खेळाडूंचे संबंध सलोख्याचे असले पाहिजेत. पंचाने कुणाची बाजू न घेता उत्तम काम करावे, असे सांगून संघटनेनेही पंचांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हा खेळ भारतातील सर्व जिल्ह्यात खेळण्यासाठी ही संघटना प्रयत्न करत आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहे. पंचाला परमेश्वर मानले जाते, म्हणून त्याने पूर्ण अधिकार आणि कोणतीही चूक न करता उत्तम काम करावे असे मार्गदर्शन केले.
प्रा. डी.बी. साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याच्या पंचांच्या कामगिरी बद्दल बोलताना, रायगडचा पंच हा अभ्यासू असून आपल्या जबाबदारीची जाणीव त्याला आहे, म्हणून त्याची कामगिरी इतर जिल्ह्यांच्या पंचापेक्षा उठून दिसते असे सांगून जिल्ह्यातील पंचांच्या आत्मविश्वासात भर टाकली. पंच पूर्ण माहितीने क्रीडांगणावर उतरला तर चांगला संदेश बाहेर जातो. पंचाना चांगले ज्ञान प्राप्त होण्यासाठी अशा शिबिरांचे आवश्यकता असते. स्पर्धा संपेपर्यंत पंचांनी कुठल्याही खेळाडूंशी संपर्क करायचा नाही, संपर्क आल्याने चुकीचा संदेश बाहेर जातो. राज्य स्पर्धेत उत्तम काम करणाऱ्या तीन पंचांना आदर्श पंच म्हणून पुरस्कार दिला जाईल.
प्रा. दिपक मोकल मार्गदर्शन करताना म्हणाले की, पंच कसा असावा पंचाकडे एकाग्रता असावी, निर्णय क्षमता असावी, शिस्त असावी, नियमांचे ज्ञान हे गुण असले पाहिजेत, याचे उदाहरण देऊन शिबीर घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. पंचांना मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात रायगडचा पंच व रायगडचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करतील. यावेळी त्यांनी बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे कौतुक करून पंचांना उत्तम अशी माहिती करून दिली.
प्रास्ताविकात शरद कदम यांनी हे शिबिर घेण्याचा मान रायगडला दिल्याने अखिल भारतीय व राज्य असोसिएसनचे आभार मानून या जिल्ह्यात जिल्हास्तरीय 96 पंच व अखिल भारतीय स्तरावर 40 पंच पास झाले आहेत ही अभिमानाची बाब आहे. धुळे येथे झालेल्या महिला व पुरुष राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडच्या पंचांची कामगिरी उल्लेखनीय झाल्याचा उल्लेख करून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही रायगडचा पंच कामगिरी करेल. शिबीर घेण्याच्या मान रायगड जिल्ह्यात दिल्याबद्दल वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले तसेच पार्ले कंपनीने हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
या शिबिराला अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी.बी. साळुंके, अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव प्रा.दिपक मोकल, अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे पंच मंडळ सचिव तथा राज्याचे कोषाध्यक्ष श्री.अंकुश पाठक, अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे पंच मंडळ सदस्य तथा राज्य संघटक श्री.शरद कदम, पार्ले बिस्कीट कंपनीचे एचआर मॅनेजर चंद्रकांत कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अखिल भारतीय स्तरावर उत्तीर्ण झालेल्या पाच अनुक्रमे प्रथम क्रमांक रविंद्र म्हात्रे, द्वितीय क्रमांक बब्रवाहन गायकवाड, तृतीय क्रमांक यतिराज पाटील, शरद कुंभार, अंतोष हासे, चौथा क्रमांक राकेश म्हात्रे, पाचवा क्रमांक सूर्यकांत पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला तर प्रा. दीपक मोकल यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्कार आणि सुनील म्हात्रे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान चित्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शेवटी पंच मंडळाचे सचिव रविंद्र म्हात्रे यांनी सर्व मान्यवरांचे व पंचांचे आभार मानताना कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल कंपनीचे श्री. चंद्रकांत कुलकर्णी यांचे आभार मानले तर सूत्र संचालन कुंदन गोरे यांनी केले.

– लेखन : हिरामण भोईर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800