नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत, रीड बेड सिस्टिमच्या माध्यमातून राज्यातले पहिले “बायो डायव्हर्सिटी पार्क” उभारल्याबद्दल बाबजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे, अतुल अनिल वैद्य यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन-पर्यावरण-राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे आदींसह मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
पोलीस अकादमीतील या रीड बेड सिस्टिमच्या माध्यमातून आता दररोज 2 लाख लिटर सांडपाणी स्वच्छ करून पुनर्वापर केले जातेय. रोज 2 लाख लिटर पाणी तर वाचते आहेच, शिवाय नदी प्रदूषण मुक्त होण्यास मदत होईल. यासाठी उभारण्यात आलेल्या निसर्ग उद्यानात 95 प्रकारची सुमारे 9 हजार पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहे. यामुळे मैला पाणी स्वच्छ होण्यासोबतच वृक्ष लागवड होऊन पर्यावरण, जैव विविधता संवर्धन होत आहे.
कोविड 19च्या संकट काळात अनेक अडचणींना तोंड देत नियमांचे पालन करत या प्रकल्पाचे काम पूर्ण केले गेले. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले आहे..

– लेखन : सागर वैद्य
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष असे की,
नाशिक मधील पोलिस अकादमी च्या माध्यमातून बायो डायव्हरसिटी पार्क उभारून रिंग बेडचा वापर करून सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करण्याची किमया केली आहे. त्याबरोबरच विविध वृक्षारोपण करून पर्यावरणबरोबरचं जैव विविधता चे रक्षण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. सदर काम कोरोना काळातही सक्षमपणे केल्याबद्दल सर्व स़बंधित विभागाच्या विभाग प्रमुख आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
आपलाच शुभेच्छूक,
राजाराम जाधव,
उलवे, नवी मुंबई,
दिनांक: ११ ऑगस्ट २०२१