फुटते वाचा आम्हाला
सहवासात
नाही तर पडून असतो
दुरावासात.
वापरात होतो मुखर
जोशाजोमात
घेतली नाही दखल नित्य
पडतो अडगळीत.
धातू भोपळा वा इतर काही
फक्त आकारात
खरी किमया घडते ती
हाताळण्यात.
स्पर्श सुखाला सोकावलेलो होतो
मग्न निनादात
स्पर्शाविना विरही जीवन
जगतो नैराश्यात.
तार गंजतात चाम सैलावतात
पडीकवासात
जोशात स्वर ताल गुंजारते
सहवासात.
ठोक ठोकूनी आणि तंतू कसता
सर्व निनादतात
शिरस्ता मोडता पडून रहातो
बंदीवासात .
बहरतो फुलतो फुलवतो जग
वाद्यांच्या गजरात
अवहेलित होता आयुष्य, होतो मग्न
मूकक्रंदनात

– रचना : सौ.राधिका इंगळे, देवास, मध्य प्रदेश
सुंदर कविता