Wednesday, September 17, 2025
Homeकलागोमय गणपती

गोमय गणपती

गणेशोत्सवाची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या “गोमय गणपती” या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री किरण जगताप आणि श्री योगेश मगर यांच्या उपक्रमाला लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे……..

पुरंदर येथील राजेवाडी मध्ये राहणारे किरण आणि योगेश हे दोन युवक, पर्यावरणपूरक गणपतीची गोमय मूर्ती आणि गोमय उत्पादने बनवण्याच्या कल्पकतेमुळे प्रकाशात आले आहेत.

गाईच्या शेणाचे महत्व लोकांना समजावे आणि त्याचप्रमाणे लोकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन करण्यास प्रोत्साहित करावे, असा या मागचा त्यांचा हेतू आहे.

किरणने स्वानंद गोविज्ञान, नागपूर येथून गाईच्या शेणाची उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते गोमय मूर्ती, पणत्या, धुपकांडी, कुंड्या इत्यादी गाईच्या शेणाने तयार करतात. या सर्व वस्तूंबरोबरच त्यांना यावर्षी गणेश उत्सवासाठी गोमय गणेशमूर्ती तयार करण्याची कल्पना सुचली. मूर्ती सुकून तयार झाल्यानंतर हर्षदा रणपिसे त्यांच्यावर आकर्षक रंग रंगोटी करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार हळदी- कुंकुसारखे नैसर्गिक रंग वापरतात.

गोमय गणपतीची मूर्ती १००% पर्यावरणास अनुकूल आहे कारण त्या बनवण्यासाठी आवश्यक साहित्य निसर्गातूनच घेतले जाते. मुख्य घटक म्हणून देशी गाईचे शेण पावडर आणि मेथीदाना, डिंकाचे पाणी, तांदळाची पावडर इत्यादी असे नैसर्गिक बंधनकारक घटक मूर्तीला बांधण्यासाठी वापरले जातात.

‘गोमई वसते लक्ष्मी’ या उक्तीला सार्थक ठरवत आणि लोकांच्या प्रतिसादामुळे किरण आणि योगेश यांनी गणपती मूर्तींचे उत्पादन वाढवले आहे. अनेक ग्राहकांनी त्यांना सकारात्मक आणि उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे .

या दोन तरुणांच्या ‘इको-फ्रेंडली’ कल्पनेबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांचे प्राध्यापक श्री प्रफुल्ल पाटील यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन वर्षभर संशोधन आणि विकास करून गोमय गणपतींच्या मूर्तीसाठी विशेष साचे तयार करण्याचे सुचवले आहे, जेणेकरून भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होईल.

कोराना साथीच्या कठीण काळात इतर उपक्रम आणि व्यवसाय थांबले. परंतु देशी गाईच्या शेणाने बनवलेल्या वस्तूंचा व्यवसाय थांबला नाही. यामुळे किरण आणि त्याच्या सहकाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो आहे.

या दोघांनी त्यांच्या उत्पादनांचे ऑनलाइन विपणन सुरू केले आहे. यामुळे वेगवेगळ्या शहरातील लोकांनी ऑर्डर देखील दिल्या आहेत. गावातील लोकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि गणपती उत्सवाच्या एक महिना अगोदरच मूर्तींची बुकिंग सुरू केली आहे.

किरण एम.ए. आहेत आणि त्यांचे सहकारी योगेश मगर यांनी वनस्पतिशास्त्रात एम. एस सी पूर्ण केली आहे. या व्यतिरिक्त किरण त्यांच्या गावात सर्व्हेमध्ये जमीन मोजणीचे काम करतात आणि शेण पावडर पासून धुपकांडी सारख्या स्थानिक उत्पादनांची निर्मिती करतात. “पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये गणपती उत्सव किती आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो, हे आपण पाहू शकतो. जेणेकुन प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तीची मागणी वाढते आणि यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे अशा नावीन्यपूर्ण कार्याची गरज होतीच”. असे किरण म्हणाले.

पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण पूरक गोमय गणपतीची संकल्पना महाराष्ट्रात सर्वदूर रुजणे खूप आवश्यक आहे.

एक नवा उपक्रम हाती घेतल्याबद्दल किरण आणि योगेश तसेच त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन💐

शीतल आखाडे

– लेखन : शीतल आखाडे, पुणे
तिसरे वर्ष, विकास संवाद केंद्र, विश्वकर्मा विद्यापीठ
– संपादन : देवेंद्र भुजबळ  9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कौतुकास्पद! ‘गोमय गणपती’ या लेखातून बोध घ्यावा असा आहे. प्रतिभा सराफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं