येता सरसर झड पावसाची
तृप्त चातक भिजल्या चोची
ओटी भरूनी गरती धरणीची
लगबग बघा त्या बळीराजाची ॥ १ ॥
कौतुक बघण्या निसर्गराज
लेवुनी आला सतरंगी साज
मयुर करी नृत्य ठसकेबाज
केकारव जणु सागरगाज ॥ २ ॥
उनसावलीची गम्मत न्यारी
लपंडावाची करूनी तयारी
क्षणात पखरण क्षणात पसारी
सुर्यमुखीची धांदरट भारी ॥ 3 ॥
कोंब डोकावती धरणी कुशीत
मधुर मोहोर तो पर्णराशीत
कोकीलकुजन ते किती खुशीत
शीळ घालती खग हर्षित ॥ ४ ॥
प्रसवुनी धरती कोंब कोवळे
खुशीत गोंजारी नवजात बाळे
गरती धरती वर्णित डोहाळे
निसर्ग गातो हरित सोहळे ॥ ५ ॥

– रचना : सुजाता येवले.
Mast👌
Khupach mast
सुंदर निसर्ग वर्णन. छानच आहे कविता.
🙏🙏 धन्यवाद सविता
🙏🙏
Khup chhan 👌
अतिशय छान
खूप सुंदर कविता!!! निसर्गाचे वर्णन अप्रतिम!!!
मस्त कविता आहे
खुप छान कविता
🙏🙏
सुजाता आपण लिहिलेले निसर्गगान अतिशय समर्पक असेच आहे. निसर्गाशी एकरूप झाले की असेच वाटते. 👌👌
🙏🙏 धन्यवाद
खुप छान!
अभिनंदन
मस्त छान
🙏🙏 धन्यवाद
व्वा छान