Monday, July 14, 2025
Homeलेखस्त्रियांचे आरोग्य - भाग - ३

स्त्रियांचे आरोग्य – भाग – ३

मानवी दुधाची बॅंक
जागतिक स्तनपान सप्ताह नुकताच साजरा केला गेला. आपल्याला सगळी कडे स्तनपानाच्या महत्वाबद्दल ऐकायला व वाचायला मिळाले.

स्तनपानाचे व आईच्या दुधाचे महत्त्व जेवढे लिहू तेवढे कमीच आहे. ह्या बद्दल सर्वांना बऱ्या पैकी कल्पना आहे की जगात आईच्या दुधापेक्षा चांगले काहीच नाही, जणू बाळासाठी अमृतच ! मग का आपल्याला
घराघरात बाटल्या आणि ह्या पर्यायी पावडर दिसतात ? देवाने स्त्री शरीराची रचना इतकी सुंदर केली आहे, की जसजशी बाळाची दुधाची गरज वाढते तस तसे आईचे दुध वाढत जाते. आईच्या दुधातून मिळणा-या इम्युनोग्लोबूयलन्समुळे प्रतिकारशक्ती वाढीस लागते.

तरीही नव्याने आई झालेली स्ञी पर्यायी गोष्टी वापरण्याची आपल्याला 10 कारणे देऊ शकते- जसे की, दूध पावडर मजबुरीने वापरावी लागते. पण ह्‍या समस्या लहान सहान अॕडजस्टमेंट करुन निस्तरू शकतात. काही सामान्य कारणे पर्याय चालू करण्याची म्हणजे- मला पुरेसे दुध नाही, बाळ नेहमी रडत असते, रात्री झोप पूर्ण होत नाही, मग त्रास होतो, आईला कामावर जावे लागते. हो निमित्त शोधणे आपल्याला अवघड नसते आणि दुसरे म्हणजे आपल्याला अतिरिक्त मेहनत घ्यावीशी वाटत नाही.

बरं तुम्हाला हे माहिती आहे का की, अशा पर्यायाची जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग करणे हा कायद्याने गुन्हा आहे ? कधी पाहीले आहे का कुठल्याही सेलिब्रिटीला 1 वर्षा आतील बाळासाठी पर्यायी अशा प्रकारच्या पावडरची जाहिरात करतांना ? पटतय नं समस्या किती गंभीर आहे ते ? मग तरीही आईच्या दुधाला पर्यायी, दुधाच्या बाटल्या आपल्याला घराघरात का दिसतात ? आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर अशा पर्यायाचे मार्केट किती तरी पटीने वाढत चालले आहे !

पण आज आपण बोलणार आहोत मोठ्या समस्यांवर, जिथे आई खरच मजबूर असते.
1. काही वेळा बाळाचा जन्म 9 महिन्यांच्या आधी झाल्यास त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागल्यामुळे आईवर मानसिक तणाव येऊन पुरेसे दूध येत नाही
2. बाळ आजारी असल्यास (necrotising enterocolotis)
3. आईच्या स्तनात गळू किंवा काही कारणा मुळे आईला दूध पाजणे शक्य नसल्यास
4. आईला HIV, क्षयरोग सारखा रोग असल्यास, किंवा कॅन्सर, किमोथेरेपी मुळे स्तनपान करणे न जमणे
5. बाळ दत्तक घेतल्यामुळे आईला दूध नसणे
अशा वेळी दुधाची पावडर हा सोपा पर्याय निवडला जायचा. पण
वर्तमानकाळात ‘आईच्या दुधाच्या बँक’ च्या माध्यमातून आपले दूध इतरांच्या बाळांसाठी दान करणे शक्य झाले आहे.

एकदा का आपल्याला आईच्या दुधाचे खरं महत्व कळले की, समजेल मानवी दुधाची बँक किती मौल्यवान आहे ते !

नेमकी काय आहे मानवी दुधाची बँक ?
सर्वात आधी दुग्धदान करणा-या आईला एचआयव्ही, कावीळ बी, सी, व सिफिलिस किंवा इतर आजार नसल्याची तपासणी करून खातरजमा केली जाते. म्हणूनच हे दुध पूर्णपणे सुरक्षीत असते.

दूध हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमवले जाते. त्यानंतर दूध 62.5 डिग्री सेल्सियसला उकळून त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर हे दूध 4 डिग्री सेल्सियसवर 3 दिवसांपर्यंत व 20 डिग्री सेल्सियसवर 12 तासांसाठी साठवून ठेवले जाते.
मग जशी गरज पडेल तसे हे दूध गरजू नवजात शिशूंना दिले जाते.

आज भारतात एकूण 80 मानवी दूध बँकांची स्थापना केली आहे, आणि ही संख्या वाढतच जाणार आहे. गरज आहे सामान्य माणसाला ह्या बद्दल माहिती असण्याची. आपल्या पैकी कितीतरी लोकांना ह्या संकल्पनेची कल्पना सुद्धा नसेल.

आईच्या दुधापासून वंचित राहणा-या तान्हुल्यांसाठी मानवी दूध बँक एक वरदान आहे. आज ह्‍या लेखा द्वारे लोकांमध्ये जागरुकता व्‍हावी हा आपला प्रयत्न आहे म्हणूनच या बँकेची माहिती असणे गरजेचे आहे !!

डॉ प्रशंसा राऊत

– लेखन : डाॕ. प्रशंसा राऊत-दळवी, गायनाॕकाॕलाँजिस्ट, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खरंच, मला प्रथमच कळले, मानवी दूध बँक कश्या उपयोगात आणल्या जातात. खूप छान माहिती डॉ. प्रशंसा यांच्या कडून मिळाली. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments