हिरव्या शेतान,
डोलारो फुलवल्यान,
रंगबेरंगी फुलान,
रांगोळी घातल्यान ॥१॥
पावसाच्या सरीन,
ऊनाक बोलवल्यान,
लपाछपीच्या खेळान,
पिकाक मोहरल्यान ॥ २॥
झाडा झुडपा,
पानान भरली,
गुलाब मोगरो,
फुलान बहारली ॥ ३॥
दुधाळ धुक्यान,
पांढरा आभाळ,
हिरव्या रानान,
थंडगार माळ ॥ ४॥
श्रावण मासात,
सृष्टी नटली,
सणवारी दिवसात,
घरादारा सजली ॥ ५॥
अळूच्या पानात,
नाग पूजलव,
रंगपंचमी सजवत,
टोपकापा केलव ॥ ६॥
उसाळलेल्या दर्यात,
श्रीफळ वाहवलव,
गाऱ्हाणा घालीत,
होडये लोटलव। ॥ ७॥
भयनीन भावाक,
राकी बांधल्यान,
प्रेमळ वचनाक,
भावान राखल्यान ॥ ८॥
कृष्णाच्या जन्मात,
पाळनो सजलो,
लोण्याच्या हंडयेत,
बाळगोपाळ रंगलो ॥ ९॥
श्रावणी सोमवारात,
शिवाक पूजलव,
अकंड मासात,
उपास धरलव॥ १०॥

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल
धन्यवाद! महाडिक सर. आपला अभिप्राय वाचून खूप आनंद झाला.🙏
मालवणी भाषेचा लहेजा घेऊन आलेली सुन्दर कविता.श्रावणाचं आरसपाणी वर्णन.
धन्यवाद! महेंद्र सर,आपले अभिप्राय माझ्या लेखनास खास आहेत.
धन्यवाद! आरोटे सर, कोकण बोली कशी वाटली?
सुंदर मालवणी भाषेतील कविता. श्रावण महिन्यातील सणावारांच यथोचित वर्णन केले आहे.
सुंदर कविता 🙏