Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याकामगारांचं दातृत्व

कामगारांचं दातृत्व

पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने संकटग्रस्त लोकांसाठी तातडीने धावून जाणे गरजेचे असल्याने आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जपली अशी भावना, हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष, विकास मयेकर यांनी व्यक्त केली.

२२ जुलैच्या अतिवृष्टीमूळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कामथी नदीला आलेल्या बेफाम पुरात साखर खडकवाडी व आडावळे खडकवाडी या दोन गावांसाठी असलेल्या नळपाणी योजनांचे दोन्ही पंपघर, मोटर व इलेक्ट्रिक मोटर मशीन केबलसह संपूर्णतः वाहून गेले होते. ग्रामस्थ मंडळींनी अल्पावधीत श्रमदानातून पुन्हा उभारलेल्या नवीन पंपघराचे उद्घघाटन मयेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाजीराव मालुसरे, संयुक्त सरचिटणीस शंकर झोरे, रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश डफळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष गिरीश विचारे, शिवसेना युवानेते अनिल मालुसरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेले महिनाभर पावसाने उघडीप घेतल्याने “ना नळाचे पाणी, ना पावसाने पडणाऱ्या वळचणीचे पाणी “अशा अडचणीत ग्रामस्थ पाण्याविना सापडले होते. याची दखल घेत पोलादपूर नाईक मराठा समाज मुंबईचे कार्याध्यक्ष व फोर्टचे माजी शाखाप्रमुख, बाजीराव मालुसरे आणि दातृत्वासाठी नेहमी तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते, दीपेश मालुसरे यांनी सिंहाचा वाटा उचलत तातडीने दोन्ही गावातील चाकरमानी तरुणांच्या मदतीने शासनाच्या मदतीची वाट न पाहता काम पूर्ण केले. यातल्या फार मोठ्या आर्थिक खर्चाचा भार, हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेने उचलून सामाजिक भूमिका पार पाडली.

पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन होत दरडी कोसळून घरांसह मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तिन्ही नद्यांना आलेल्या बेफाम पुरांमुळे तर दोन्ही बाजूच्या शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत तो उध्वस्त झाला आहे याची प्रत्यक्ष पाहणीही यावेळी मुंबईतील कार्यकर्त्यांनी केली.

कोरोनाच्या आजारामूळे तिन्ही खोऱ्यातील बाधित रुग्ण ग्रामीण भागातून महाड कोविड रुग्णालयापर्यंत सुखरूप पोहोचावा यासाठी संघटनेच्या वतीने पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय मदत म्हणून भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लऊ मालुसरे, गणेश मालुसरे, गोपाळ जाधव, तानाजी मालुसरे, रामभाऊ मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली.

रवींद्र मालुसरे

– लेखन : रवींद्र मालुसरे
अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४