थोर गांधीवादी, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज १२६ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती उपसंचालक श्री सुधाकर धारव तथा वर्धा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी यांनी सांगितलेली हृद आठवण….
विचार आणि अविचार
प्रसन्न पहाट होती. धाम नदी संथपणे वाहत होती. परमधाम आश्रमात विष्णु सहस्त्रनाम एक सूरात आश्रमवासी म्हणत होते.
आचार्य विनोबा भावे त्यांच्या हवेशिर दालनात तख्त पोसवर बसले होते. बाजूला त्यांचे स्वीय सहायक ‘बालविजय’ बसले होते.
आम्ही उभयंतानी बाबांच्या कक्षात प्रवेश केला. प्रणिपात केला. बाबांनी बसन्याची खूण केली. आमच्याकडे न पाहता ते म्हणाले, तुम्ही प्रसिद्धि अधिकारी आहात, तेव्हा खादीचे कपड़े वापरले पाहिजेत. लक्षात ठेवा ‘खादी हा एक विचार आहे’.
त्यानंतर आमच्या सौ.कड़े वळून ते म्हणाले, ते दाखवा, तिच्या सोन्याचा बांगडया हातात घेऊन त्यांनी निरखुन पाहिल्या, अन एकदम बाहेर फेकून दिल्या ! स्त्रियांनी सोन्याचा हव्यास करणे ‘अविचार’ आहे. पुनः आश्रमात येताना लक्षात ठेवा !
मी आश्रमातुन घेतलेली, ‘महात्मा गांधी’ आणि ‘मधुकर’ ही पुस्तके बाबांनी मला मागितली, पेन मागितले, त्यावर सुंदर अक्षरात लिहिले-
सत्य+प्रेम+करुणा… …
आजच्या जयंतीनिमित्त विनोबाजींना विनम्र अभिवादन🙏

– लेखन : सुधाकर धारव
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
विनोबाजींना विनम्र अभिवादन