जय देव जयदेव जय गणराया
तुमचा अवतार असे संकट ताराया
जयदेव जयदेव ।। धृ ।।
कलियुगी माजले संकटे किती
तुमच्या नावे भक्त जयजयकार करती
काहीतरी करा कोरोना नष्ट कराया
तुमचा अवतार असे संकट ताराया
जयदेव जयदेव ll १ ll
आगामी वर्षी झाला जल प्रलय
कित्येक लोकांचा त्यात झाला विलय
नदी नाले करती जल तांडव
किती तरी अन्नधान्य गेले हो वाया
तुम्हीच या आता संकट ताराया
जयदेव जयदेव ll २ ll
शासन दरबारी काही न चाले
सोम्या गोम्या म्हणुन सगळेच गेले
सत्तेसाठी सगळी लागलेत भांडाया
तुमचा अवतार असे जग ताराया
जयदेव जयदेव ll ३ ll
प्रत्येक जण उठतो मंडळ काढतो
तुमच्या नावे तो खेळ खंडोबा करतो
खंडणी गोळा करून लागलेत पुढारी व्हाया
तुमचा अवतार असे जग तारावया
जयदेव जयदेव ll ४ ll
किती गाऱ्हाणी तुम्हा ते सांगु
कमरेचे काढुन डोक्याला टांगू
येडी पिशी जनता लागली या रांगु
तुम्ही च या हो समजुत काढाया
तुमचा अवतार असे भक्त ताराया
जयदेव जयदेव ll ५ ll
– रचना : प्रो डॉ जी आर प्रवीण-जोशी
अंकली / बेळगाव