दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील एक लखलखतं नाव म्हणजे लक्ष्मणराव.
एका ध्येयाने पछाडलेले आणि ते ध्येय पुर्ण करून पूढे-पूढेच चालत जाणारे असे हे लक्ष्मणराव मुळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगावचे. लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने गुलशन नंदा सारखे लेखक बनण्याची ओढ होती. अशातच गावात एक घटना घडली. त्यावर आधारित ‘रामदास’ ही कांदबरी त्यांनी हिंदीत लिहीली. त्याच्या प्रकाशनासाठी दिल्लीचा मार्ग पडला.
दिल्लीत लक्ष्मणराव यांना अनेक प्रकाशकांनी नकार दिल्यावर त्यांनी स्वत:च ती कांदबरी प्रकाशित केली. त्याची विक्री ही केली. आज या ‘रामदास’ च्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.
एक एक करता आज त्यांची 35 पुस्तकं आहेत. यामध्ये कथासंग्रह, कांदबरी, संशोधनात्मक लेखनाचा समावेश आहे.
लक्ष्मणराव यांची दुसरी ओळख अशी की ते दिल्लीच्या आयटियो परिसरातील हिंदी भवनाच्या समोर चहा विकायचे. येथेच त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे ही दालन असायचे. असे सलग 25 वर्षापर्यंत चालले. आता तिथे चहाचे दुकान नाही मात्र, लक्ष्मणराव आजही तिथेच लिहितात आणि पुस्तकांचे दालन मांडून बसतात. विशेष म्हणजे लक्ष्मणरावांनी जेव्हा लिहायला सुरूवात केली तेव्हा त्यांचे जुजबी शिक्षण झाले होते. त्यांनी दुकान व लिखाण सांभाळून वयाच्या चाळीशीनंतर पदवी, पदवीत्युर शिक्षण पूर्ण केले.
आता लक्ष्मणराव संसद भवनाच्या जवळच असणा-या एका आंतरराष्ट्रीय पंचताराकिंत हॉटेलच्या साखळीतील दिल्लीतील हॉटेलमध्ये ‘टी कन्सल्टन्ट’ म्हणुन रूजु झालेत. लक्ष्मणरावांचा हा सर्व प्रवास थक्क करणारा असाच आहे. त्यांचे वय 70 वर्षे आहे.
त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन चहा आणि लिखाण यांच्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भरभरुन लिखाण केले आहे. त्यांच्यातील साधेपणाचे ही कौतुक झाले आहे. त्याचीच दखल या पंचताराकिंत हॉटेलने घेतली आणि त्यांच्यासोबत एक वर्षाचा करार केला.
या पंचताराकिंत हॉटेलमध्ये त्यांचे काम सकाळी 6.30 ते 11.30 पर्यंतचे असते. येथे त्यांच्या पुस्तकाचे दालनही आहे. आज ते या हॉटेलचे स्टार आहेत.
लक्ष्मणराव म्हणतात, ही नवीन सुरूवात आहे. आणखी बरेच लिखाण करायचे आहे. त्यांच्या या न्यु बिगिनींगला सलाम.
– लेखन : अंजु कांबळे, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
मनाने ध्यास घेतला म्हणजे कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध होते.आदरणीय लक्ष्मणराव कांबळे यांची
कथा वाचून त्यांचा जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन माणसाला प्रेरणा देतो.
लक्ष्मणराव ..
न्यू बिगिनिंग या शीर्षकाखाली अमरावती येथील श्री लक्ष्मण राव यांची यश कथा वाचून मीही नव्या जीवनाची करत आहे. लक्ष्मणराव यांचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे त्यांच्या प्रवासाला माझा मनःपूर्वक सलाम….