आई तुझे आजारपण
आज खऱ्या अर्थाने जाणवले
लेकरांपासून लपविलेले दुखणे
अबोल डोळ्यांमध्ये दिसले
तुझ्या मायेच्या स्पर्शाचा भास
अंतःकरणास सतावत आहे
तुझ्या विना आयुष्य हे
एकाकी वाटत आहे
आभाळाची छाया तुझी
सदैव आम्हावर असावी
तुझ्या मायेच्या उबेखाली
भिती कशाचीही नसावी
घराचे घरपण राखलेली
अंगणी तुळस सजवलेली
अशी तू गंगासम पवित्र
मनाच्या कप्प्यात रूजलेली
तुझी दयनीय अवस्था
मनाचे अंगण ओलावते
गच्च भरलेले आभाळ
कोसळून मोकळे होते
मनाच्या गाभाऱ्यात पूजनीय
ठेवावे माथा तुझ्या चरणांवर
देवा समोर एकच मागणे
सदैव हात असावा डोक्यावर

– रचना : परवीन कौसर, बेंगलोर