महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांच्या “अंधारयात्रीचे स्वप्न” व “अजिंक्यवीर” या पुस्तकांचे शानदार प्रकाशन नुकतेच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक उषा तांबे या होत्या.
शतकानुशतके विकासापासून वंचित राहिलेल्या समाजातून आज एकेक ‘अजिंक्यवीर’ घडत आहे, हे बघताना खूप आनंद होतो, असे मनोगत श्रीमती उषा तांबे यांनी व्यक्त केले. श्री जाधव यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले, “अंधाऱयात्रीचे स्वप्न” व स्वतःचा जीवन संघर्ष असलेले “अजिंक्यवीर” ही दोन्ही पुस्तकं वाचताना, स्वतः निरक्षर असूनही मुलाच्या शिक्षणाविषयीची आस व त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वतः श्री जाधव यांनी, वेळप्रसंगी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काय काय कामे केली हे वाचून मन भरून येते असे सांगून त्यांनी त्यांच्या पुढील लेखनाला शुभेच्छा दिल्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे यांनी आपण स्वतः आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून जीवनाची वाटचाल करीत आहोत, त्याप्रमाणे श्री. जाधव यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, याचे समाधान वाटते असे सांगितले.
न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्ष भरात भारतात १ लाख ३९ हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ९० हजार आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या आहेत, ही अत्यन्त चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या श्री राजाराम जाधव अशांच्या प्रेरणादायी यशकथा घराघरात पोहोचणे अत्यन्त गरजेचं आहे असे प्रतिपादन केले.
संशोधक, प्रा.डॉ. अशोक पवार यांनी बंजारा समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करून श्री. जाधव यांच्या यशाचे महत्व स्पष्ट केले.
माजी आमदार श्री हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्या व श्री. जाधव यांच्या ४०/४५ वर्षांच्या मैत्रीचा हवाला देऊन, त्यांच्या सर्व वाटचालीचे आपण साक्षीदार आहोत, असे सांगितले.
ही पुस्तके प्रकाशित केलेल्या भरारी प्रकाशनच्या, लता गुठे यांनी त्यांच्या प्रकाशनांचा आढावा घेऊन दोन्ही पुस्तकांची वैशिष्ट्ये सांगितली.
लेखक श्री राजाराम जाधव यांनी पुस्तकं लिहिण्यामागची प्रेरणा सविस्तर पणे सांगून आईवडील आणि विशेषतः ज्या प्राध्यापकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्यांचा मनोभावे उल्लेख केला.

राज्याचे निवृत्त मुख्य सचिव श्री जे एस सहारिया यांनी त्यांच्या ध्वनीचित्रमुद्रित शुभेच्छा संदेशात श्री जाधव यांनी त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ मृन्मयी भजक यांनी केले.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता.
– टीम एनएसटी 9869484800
सौ. अलका
सौ.सुनंदाचा,
स्नेहपूर्वक सप्रेम नमस्कार
अलका यू पी एस सी च्या निकालाची अगदी पोस्ट सहित इत्यंभूत माहिती दिली. धन्यवाद .
Oh… I m unfortunately can not attend our friends Book publication ceremony. So I Heartly sorry. But one more thing I hv to mention that our beloved friend Mr Devendraji Bhujbal were special guest in program. So then there is no any difficulty to make program successful. It’s the most part of Bhujbal Sir work. Being a most experienced and very intelligent officer in publicity department of Maharashtra Govt. he has given most opportunities to such people those Who are deprived from showing their supta Gun. Bhujbal Sir gives opportunity to such people through their portal. I personally thanks for them doing such very nice work after their retirement. Both he and his wife are very much interested in doing such work. Bhujbal Sir is having multiple viewer. He has also gone through such tough condition during his school life as well as highschool and college life as he also observed in Rajaram Jadhav’s life in which jadhsv has narrated it in his book Ajinke veer and another one book. So this is the speciality of our Bhujbal Sir that they wants to put them ahed of public. It was my honour that such candidate we selected in administration during selection period and appointed. So best of luck to your future and good wishes. BSGaikwad.
आदरणीय देवेंद्र जी भुजबळ साहेब धन्यवाद.
आपण नेमक्या शब्दात वस्तुनिष्ठ पणे आम्हाच्या नोंदी घेतल्या.
डॉ अशोक पवार लोहरेकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
९४२१७५८३५७
pawarashok40@gmail.com
सन्माननीय भुजबळ साहेब,
नमस्कार,
आपण मराठी न्यूज स्टोरी टुडेच्या माध्यमातून ” अंधार यात्रिचे स्वप्न ” आणि अजिंक्यवीरच्या प्रकाशन कार्यक्रमाचे – सोहळ्याचे वास्तववादी समिक्षण तसेच सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मांडलेल्या विचारांचे अतिशय उत्तमपणे समाचार घेतला. या सर्व मान्यवरांचे विचार व भावना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. त्यामुळे आपण, भरारी प्रकाशन आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. माझ्याप्रती आपण सर्वांनी असाच स्नेहभाव ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला सर्वांचा स्नेहांकित,
राजाराम जाधव आणि परिवार,
लेखक आदरणीय राजाराम जाधव यांचे दोन्ही पुस्तके प्रकाशित केल्या बद्दल प्रथम अभिनंदन जीवनातील संघर्ष मानसाला घडवतो.त्यांनी जो प्रवास केला तो
इतरांना प्रेरणा देणारा ठरावा.