Saturday, July 5, 2025
Homeसंस्कृतीकेरळी अलंकार

केरळी अलंकार

नमस्कार, वाचक हो.
आज आपण केरळ मधील दागिन्यांविषयी माहिती घेणार आहोत.

केरळ मध्ये पूर्वीपासूनच सोन्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चालतो. प्रत्येक शुभ कार्यक्रमासाठी, सणासाठी दागिने घेणे, नवीन बनविणे चालू असते. अर्थात ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. इथे आठ ग्रॅम म्हणजे एक तोळा असं हिशेब असतो.

विवाह कार्यक्रमामध्ये मोठी देवाण घेवाण होते सोन्याच्या दागिन्यांची. नववधू दागिन्यांनी पूर्ण मढलेली असते. हात भरून विविध आकाराच्या सोन्याच्या बांगड्या, गळयात वेगवेगळ्या प्रकारच्या, नक्षीच्या लहान मोठ्या माळा, अंगठ्या आणि अजून बरेच काही.. नवीन दागिन्यांचे प्रकार वापरले जातात. त्याबरोबर पण पारंपरिक दागिनेही आवडीने आवर्जून वापरले जातात.

पारंपरिक गळ्यातील एक प्रसिद्ध हार म्हणजे mango necklace हा खूप लोकप्रिय दागिना आहे. कैरी किंवा पिकलेला आंबा हिरव्या किंवा केशरी दोन्ही रंग वापरून हा नेकलेस बनवतात. Kasu mala छोटी छोटी सोन्याची नाणी एकत्र गुंफुन हा हार तयार केला जातो.

मँगो नेकलेस

गळ्यात घालायच्या माळा छोट्या चैनी पासून ते मोठ्या आकाराच्या हारांचे विविध प्रकार, एक से एक नक्षमध्ये आपणाला पाहायला मिळतात.

बांगड्याचे प्रकार पाहिले तर तेही छोट्या पासून मोठ्या आकरात, आकर्षक नक्षीत आपणास मिळतात.

बाजूबंद, कमरपट्टा आणि सोन्याच्या पैंजण मध्येही खूप नवीन जुन्या डिजाईन्स असतात.

केरला टेम्पल ज्वेलरीचे सुंदर प्रकारचे दागिने आपल्याला मोहवून टाकतात.

मीना वर्क केलेली, आकर्षक रंगातली कर्णफुले खूप प्रसिद्ध आहेत.

नैसर्गिक सृष्टी, खाद्य पदार्थ, वन संपदा याबरोबरच इथले दागिनेही आपल्याला भुरळ घालतात.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments