Tuesday, September 16, 2025
Homeबातम्यालेखिका रश्मी हेडे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

लेखिका रश्मी हेडे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

कोरोना काळात लोकांना मार्गदर्शन करणारे, दिलासा देणारे लेखन सातत्याने केल्या बद्दल सातारा येथील लेखिका रश्मी हेडे याना नुकतेच नाशिक येथे झालेल्या शानदार सभारंभात कर्तृत्ववान स्त्रियांसाठी असलेला स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार २०२१ झी मराठीचे अभिनेते चिन्मय उदगिरकर यांच्या हस्ते देऊन
गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना श्री चिन्मय उदगिरकर म्हणाले की, ज्या महिलांनी स्वतःला सिद्ध केले त्यांना हा अतिशय मानाचा स्वयंसिद्धा पुरस्कार देण्यात येतो. स्त्री आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून अनेक क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करत असते. ही तिची तारेवरची कसरत असते. अनेक संघर्ष व अडचणींवर मात करून ह्या पुरस्काराची मानकरी ठरते. कोरोनाच्या काळात ज्या ज्या स्वयंसिद्धांनी, स्त्रियांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे येऊन सर्वोतोपरी मदत केली लढा दिला आहे त्या सगळ्यांचा हा सन्मान आहे. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक असते. त्यामुळे हा पुरस्कार जणू तिच्या साठी मानाचा तुरा आहे जो तिच्या पुढील कार्यासाठी नक्कीच बळ देईल.

चिन्मय  उदगिरकर

प्रमुख पाहुण्या मिसेस इंडिया इंटर नॅशनल संगीत खैरनार यांनी देखील सर्व महिलांचे कौतुक अभिनंदन केले. प्रत्येक स्त्रीने पुढे गेले पाहिजे, आपल्या कला जोपासल्या पाहिजेत, असे त्या यावेळी म्हणाल्या.

संगीत खैरनार

प्रारंभी अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महेंद्र देशपांडे यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली.

महेंद्र देशपांडे प्रास्ताविक करताना

सर्व पुरस्कारार्थीना मराठमोळा फेटा, राष्ट्रीय सन्मानचिन्ह व आकर्षक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातुनच नव्हे तर इतर राज्यातून देखील काही महिला पुरस्कार्थी होत्या. कार्यक्रमास मोठया संख्येने महिलांनी हजेरी लावली होती.

रश्मी हेडे यांचे मनोगत
रश्मी हेडे या पुरस्काराचे श्रेय प्रथम त्यांचे पती उल्हास हेडे, त्यांच्या आई व सासू सासरे यांचे आशिर्वाद, सर्व कुटुंबाची साथ, त्यांचे मार्गदर्शक देवेंद्र भुजबळ ह्यांना दिले.

तसेच सर्व वाचक वर्ग, समाज व मैत्रिणीच्या प्रेरणे मुळे हे शक्य होऊ शकले. तसेच सौ आशा ताई कुंदप, अशोक काका व नेहमीच प्रोत्साहन व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या अलका ताई ह्या सर्वांच्या त्या अत्यंत ऋणी आहेत.

हा पुरस्कार त्यांच्या कामाची पोच पावती असली तरी ही खरी सुरवात आहे असे त्यांना वाटते. कारण जबाबदारी अजून वाढली आहे, लोकांचा विश्वास, त्यांच्या अपेक्षा सार्थ करायच्या आहेत व अजून जोमाने काम करायचे आहे असे त्या सांगतात.

कष्ट, चिकाटी व प्रामाणिकपणा असेल तर प्रगती निश्चित असते व अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य मिळते.

यावेळी सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी व विविध मान्यवर उपस्थित होते. लकी ड्राद्वारे चार महिलांना पैठणी देण्यात आल्या. अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीनेही तीन बक्षीसे देण्यात आली.

कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. आदरणीय रश्मीताई यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आणि फार आनंद झाला त्या आमच्यापैकी परिवारातील एक आहेत त्यांचं लेखन नेहमीच प्रेरणादायी असत

  2. आमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या लेखिका सौ. रश्मी हेडे यांना स्वयमसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन… यापुढे आपणाकडून अशीच अभिमानास्पद कामगिरी होणार आहे…

    • प्रिय मैत्रीण आणि लेखिका रश्मी तुला स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार भेटल्या बद्धल तुझे खूप खूप अभिनंदन. संसारिक जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पाडून साहीत्य क्षेत्रातील तुझी प्रगती उल्लेखनीय आहे. तुझी कामाची चिकाटी, कामाचा उत्साह आम्हाला नेहमीच प्रेरणा देतो. आमच्यात सकारात्मकता निर्माण करतो. आम्हाला तू आमची मैत्रीण आहेस याचा खूप आभिमान वाटतो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  3. लेखिका रश्मी हेडे, तुम्हाला मिळालेला सन्मान पाहून व वाचून खूप अभिमान वाटला. खूप खूप अभिनंदन!

    वर्षा भाबल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments