जानेवारी २०२०मध्ये अलिबाग येथे ‘शोध मनाचा ‘ हे जागतिक मराठी भाषा संमेलन भरले होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, इस्रायल, जर्मनी, बहरीन आणि फ्रान्स अशी देशविदेशातील मंडळी तेथे पाहुणे म्हणून उपस्थित होती. ‘ जागतिक मराठी भाषा परिषदे’ चे अध्यक्ष श्री. रामदास फुटाणे आणि त्यांच्या समितीने हे संमेलन आयोजित केले होते. त्यात व्यासपीठावर बीएमएमच्या अध्यक्ष विद्या जोशी यांचा सत्कार झाला.
बीएमएम म्हणजे अमेरिकेतील सात सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्र मंडळांची शिखर कार्यकारणी . या कार्यकारणीचे नेतृत्व एक तरुण स्त्री करत आहे हे पाहून मी कौतुकाने बघू लागले. उद्घाटन समारंभाच्या भाषणात विद्या जोशी यांनी २०१४मध्ये शिकागो येथे मराठी शाळा स्थापन केल्याचे सांगितले. मग माझे कुतूहल आणखीनच वाढले. समारंभानंतर मी त्यांची भेट घेऊन सविस्तर मुलाखत घ्यायचे ठरवले.
To read Click here सिंगापूरच्या मोहना
कार्यक्रमानंतर झालेल्या भेटीत, विद्या जोशी यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधायला मिळाला. अमेरिकेतील मराठी भाषिकांची वाटचाल आणि संस्कृतीचे संवर्धन या बद्दल माहिती मिळत गेली. विद्या जोशी मूळच्या पार्ले अंधेरी येथे शिक्षण घेतलेल्या आणि शाळा कॉलेजमध्ये सर्व स्पर्धा गाजवणाऱ्या, कॉलेजमध्ये कल्चरल सेक्रेटरी म्हणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या, संगीत व नृत्याचे शिक्षण घेतलेल्या, एक उत्तम कलाकार आणि कार्यकर्ती. नेतृत्व गुण मुळातच त्यांच्या अंगी होते. तसेच शाळा कॉलेजची हुशार विद्यार्थिनी. विद्या होमिओपॅथी डॉक्टर झाली. पुढे तिने ‘होमिऑपाथी एक वरदान’ असे पुस्तक सुद्धा लिहिले.
लग्नानंतर २०१०मध्ये अमेरिकेत तिने हेल्थकेअर या विषयात एमबीए केले. त्यानंतर हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नोकरी करत आहे. सर्व व्यवधानं सांभाळून २०११मध्ये विद्या शिकागो महाराष्ट्र मंडळात काम करू लागली. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने २०११मध्ये संमेलन झाले. हे संमेलन म्हणजे सात महाराष्ट्र मंडळांचे एक शिखर संमेलन होते. सर्व मंडळाच्या सभासदांना एकत्र करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या गेले . मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन करणे हाच या संमेलनाचा उद्देश होता .
To read Click hereनेदरलँड्सची प्रणिता
विद्याला कार्यक्रम समितीत काम करायला मिळाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, हा तर तिचा आवडीचा विषय होता. ” या संमेलन समिती सोबत काम करणे ही एक मोठीच संधी होती. माझीही जडणघडण यातून होत होती. अशा संमेलनाच्या आयोजनासाठी एक दीड वर्षांची मेहनत लागते.” विद्या हे सर्व सांगताना त्या आठवणीत रंगून गेली होती. बीएमएमची कमिटी या संमेलनाचे आयोजन दर दोन वर्षांनी करते आणि वेगवेगळीं मंडळे यासाठी पुढाकार घेतात. भारतातून अनेक साहित्यिक, नाटकातील, चित्रपटातील कलाकार पाहुणे म्हणून येतात आणि सादरीकरण करतात. जवळ जवळ पाच हजार मराठी लोक संमेलनाला हजर असतात.
ही संमेलने१९८४ पासून होत आहेत आणि प्रतिसादही मिळत आहे. मात्र किशोर आणि तरुण मुलांची उपस्थिती कमी दिसत होती. युवा पिढीला या सर्व उपक्रमाशी कसे जोडून घ्यायचे हा प्रश्न उभा राहिला. त्यावर विचार करून बीएमएम कार्यकारिणीने अमेरिकेत मराठी शाळा सुरू करून मराठी भाषेचे शिक्षण देण्याचे ठरवले. त्याला अनुसरून २००७ च्या फिलाडेल्फिया येथील एका संमेलनात मराठी भाषा शाळा काढण्याचा प्रस्ताव सर्वमान्य झाला. भारती विद्यापीठ, पुणे यांची संलग्नता घेऊन समितीची नेमणूक, अभ्यासक्रम, परीक्षा हे सारं ठरवलं. ठिकठिकाणी मराठी शाळा सुरू झाल्या. विद्या जोशी यांनी शिकागो येथे सुरू केलेल्या शाळेत ९१ विद्यार्थी आहेत. दोन बॅचेस मध्ये ही शाळा चालते.
आपण समाजाचेही काही देणे लागतो, या विचाराने विद्या सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्थांसोबत काम करत आहे. त्यातली ‘एकजूट’ ही प्रवीणाकुमार यांची संस्था स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करते.”आम्ही स्त्रियांच्या प्रश्नांवर छोटी स्कीट्स बसवणे, मोनोलॉग बसवणे वा संवाद बसवणे, निरनिराळ्या ठिकाणी सादरीकरण करणे अशा कार्यक्रमातून जागृती करतो. अमेरिकेत लग्न होऊन आलेल्या नवीन मुली बरेचदा फसवल्या जातात. त्यांचा छळ होतो. तेव्हा त्यांच्या पाठीमागे परिवाराच्या सदस्यांसारखे उभे राहण्यासाठी प्रेमळ स्त्रियांनी काढलेली ही संघटना आहे. समस्येने ग्रासलेल्या स्त्रियांना आम्ही मानसिक आधार देतो.
To read Click hereभरारीच्या लता गुठे
“स्त्रियांना आधाराची गरज असते. तसेच अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही असते. विद्यार्थ्यांना या देशात येताना इथले वातावरण नियम आणि रोजच्या गोष्टींना लागणारा खर्च याची सहसा कल्पना नसते. येथे काही समस्या आल्या तर भारतातले पालक येऊ शकत नाहीत. म्हणून ‘सहाय्यास’ संस्था आम्ही काढली आहे. माझी मुलगी देखील या संस्थेत काम करते.” विद्या म्हणाली, “सहाय्यास “संस्था विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारते. आजारपणं, अपघात अशा काही अडचणी येतात. तेव्हा त्यांना गाईड करते. ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते.”
विद्या जोशी सारखे तरुण कार्यकर्ते बीएमएमला नक्कीच वरदान ठरत आहेत.विद्या आपल्या कमिटीतील सर्व सहकाऱ्यांचा उल्लेख वारंवार करत होती. “मी एकटी काहीच करत नाही. नॉर्थ अमेरिकेत मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन बीएमएम कमिटी आणि अनेक महाराष्ट्र मंडळे करत आहेत. सर्व मराठी सण म्हणजे गणपती, दिवाळी, संक्रांत असे एकत्र साजरे केले जातात. बीएएमएमच्या संमेलनामध्ये पुढील पिढीला सामावून घेण्यासाठी मराठी शाळेसाठी काही अवधी दिला जातो. तेव्हा मराठी शाळेची मुले संमेलनात सहभागी होतात. सुनंदा टुमणे या सर्व शाळांचे कोऑर्डिनेशन पाहतात.”
Click here‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी’
विद्या जोशी यांनी आपल्या पुढील योजनांबद्दल सांगितले. ” ‘गप्पागोष्टी ते रेशीमगाठी’ असा उपक्रम लवकरच सुरू होत आहे. गप्पागोष्टी म्हणजे लहान मुलांचे मनोरंजनातून शिक्षण व मूल्यांचे जतन आणि रेशीमगाठी म्हणजे बीएमएम मॅट्रिमोनियल साईट लवकरच सुरू होत आहे. लहान मुलांची आपल्या मराठी भाषेशी नाळ जोडून देणे आणि त्यांना मराठी संस्कारांची माहिती करून देणे तसेच तरुण मुलांचे मराठी समाजात विवाह जोडणे हे आमचे ध्येय राहील. ” विद्या जोशी यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊन मी निरोप घेतला.
By मेघना साने.
Click hereप्रशांतची झेप मलेशियात to read
सुंदर लेख आहे.खुप छान 🙏🙏🌹🌹🤝
Thank you