गायकाच्या मनी असे,
गुंजारव तो स्वरांचा
लेखकाच्या मनी वसे,
मुक्त विहार शब्दांचा ।।१।।
चित्रकार मनी शोधी,
सप्त-रंगी इंद्रधनु
शिल्पकार मनी पाही,
मूर्त सजीवच जणु ।।२।।
नृत्यांगना मनी एैकी,
पदन्यास घुंगुराचे
शास्त्रज्ञ मनांत शोधी,
“गुढअर्थ” या विश्वाचे ।।३।।
शेतकऱ्याच्या मनांत,
असे आस्था पर्जन्याची
कष्टकऱ्याच्या मनांत,
सदा चिंता भाकरीची ।।४।।
माझ्या मनी नित्य असो,
नादध्वनी ओंकाराचा
माझ्या मनी नित्य वसो,
ध्यास प्रभुचरणाचा ।।५।।

– रचना : सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन, यु.के.
सुंदर कविता!