आजी सांगायची गोष्ट
सुरुवात करायची…
“एक होता राजा
त्याला दोन राण्या
एक आवडती
अन्….
दुसरी नावडती…
गोष्ट अर्धवट सोडून
मी गोष्टीतून बाहेर पडायची
नि…
निद्रादेवीच्या स्वाधीन व्हायची
एक दिवस…
मी म्हणाले आजीला…
आजी…
आज मी गोष्ट सांगते
एक होती राणी
तिला होते दोन राजे
एक आवडता
दुसरा नावडता…
आजीने ठेवलं बोट ओठांवर
आणि….
इकडे तिकडे पाहिलं
हळूच कुजबुजली कानात
हे काय तुला
आक्रीत सुचलं
असं कधी असतं का ?
का नसतं…?
माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे !

– रचना : लता गुठे
उत्तरार्धात दिलेला प्रश्न इतका मोठा आणि गंभीर आहे की काय बोलावे हेच सुचत नाही , लहागीनं (अर्थात तुम्हीच )हा प्रश्न समाजासमोर मांडून निशब्द केलं आहे