सिगरेट चहा फुकट गप्पा.
सुख दुःखाचा मोठा कप्पा
आळस झोपा महान मजा.
पैसे उडवणे ही पण सजा
काम कष्ट माझे माझे
दूर आहे आलबेल सारे
खूप काही आपले परके
दुरावा वाढत जीव बारके
शब्द आहेत भाव नसताना
श्वास कमी एकटे जगताना
खरेदीत झाले जग थोटके
मूल्य किंमत सारे सारखे
माघार नाही जगणे जगताना
धाप आहे आता चालताना
कोनाड्यात दिवा गप्प एकटा
वारा पाऊस होईल धाकटा
वळून पाहिले मागे एकदा
खर्च झाले जीवन कैकदा
– रचना : प्रसाद माळी, नवी दिल्ली