Tuesday, September 16, 2025
Homeयशकथाआयएएस मुलींची आई

आयएएस मुलींची आई

भारतीय प्रशासकीय सेवेत 2016 मध्ये देशातून प्रथम येणा-या टिना डाबी आणि 2020 मध्ये 15 व्या क्रमांकावर आलेल्या रिया डाबी या दोन्ही मुलींच्या मागे त्यांची आई हिमाली डाबी (कांबळे) यांची मेहनत आहे.

हिमाली डाबी यांनी दूरदृष्टी ठेऊन दोन्ही मुलींना प्रशासकीय सेवेत येण्यासाठी बी.ए. चे शिक्षण घ्यायला लावले. सोबतच देश पातळीवरील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यूपीएससी साठीची ही तयारी करण्यासाठी प्रेरित केले. दोन्ही मुली वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास झाल्यात. टिना डाबी यांना आयएएसचे कॅडर मिळाल आहे. रिया यांनाही आयएएसचे कॅडर मिळणार हे निश्चित आहे.

टीना आणि रिया  डाबी

या दोन्ही मुलींना आयएएसच्या माध्यमातून देशसेवा करायला प्रेर‍ित करण्याचे श्रेय त्यांच्या आई हिमाली डाबी-कांबळे यांचे आहे.

हिमाली डाबी-कांबळे या मुळच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. त्यांची आई ही भंडारा जिल्ह्याची तर वडील हिंगणघाटचे होते. शासकीय नोकरी निमित्त ते मध्यप्रदेश मध्ये गेलेत आणि तिथलेच झालेत. हिमाली डाबी-कांबळे यांचे बाबा मध्यप्रदेशातील जलसंपदा विभागात कार्यरत होते.

श्रीमती हिमाली यांचे शिक्षण आणि उच्च शिक्षण हे भोपालमध्ये झाले. त्यांनी इंजिनीयंरींगचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनीही युपीएससीची स्पर्धा परिक्षा दिली. इंजिनीयरींग सेवेचे कॅडर त्यांना मिळाले. त्या दूरसंचार विभागात अधिकारी म्हणून रूजु झाल्या. पुढे त्यांचे ज्यांच्यांशी लग्न झाले ते श्री डाबी हे सुध्दा इंजिनियरींग सेवेतील, दूरसंचार विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर आहेत.

हिमालीजींनी स्वत: स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेऊन मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. मुलींनी भारतीय प्रशासकीय सेवेत यावे यासाठी नियोजनबद्ध पध्दतीने कार्यक्रम तयार करून तो राबविला आणि त्यात त्यांनी 100 % टक्के यश मिळविले.

यासाठी जवळपास 10-15 वर्ष त्या स्वत: अभ्यास करीत राहील्या. त्यांचा चालू घडामोडींचा अभ्यास या सगळया काळात फार चांगला झाला.

टिना डाबी या 2016 मध्ये युपीएससीतून देशात प्रथम आल्यानंतर, हिमाली यांनाही युपीएससी शिकविणा-या खाजगी कोचिंग सेंटर्सकडून शिकविण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्या बँगलोर, भोपाल, दिल्ली, राजस्थान येथे शिकवण्या द्यायला जाऊ लागल्यात.

त्यांचा दिवस सकाळी 5 वाजता वर्तमान पत्र वाचण्यापासून सुरू होतो. त्यानंतर घरची रोजची कामे संपवून पुन्हा त्याही अभ्यासाला लागतात. त्यांच्या स्पर्धा परिक्षांना बसणा-या उमेदवारांना मार्गदर्शनही करतात. त्यांच्या माध्यमाने पुन्हा हे एकदा सिद्ध झाले आईने जर ठरविले तर ती काहीही करू शकते.

डाबी परिवार

एका आईमुळे बाल शिवाजी छत्रपती शिवाजी राजे होऊ शकले. सावित्री आईमुळेच मुलींच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला. हिमाली डाबी-कांबळे यांनी ही आपल्या मुलींसह समाजापुढे आर्दश निर्माण केला आहे. त्यांच्याकार्य कर्तृत्वाला मानाचा सलाम.

अंजु निमसरकर

– लेखन : अंजु निमसरकर-कांबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. It is excellent article on both sisters leading IAS exmn. Sad that we haven’t utilised her talent to coach our boys and girls. I told Mrs. Kable-Dabi to start writing book on coaching.. I think mom passed IAS before kids did. All the best to family..

  2. Salutes to The Mother.Very big achievement of life..
    its possible to leave self job for kids but not that much easy too.
    you made it.. Congratulations to you n Daughters.

  3. Yes surely, all two daughters and parent are basically eligible for congratulations for their individual achievement. Parents Hv cltured to their children and children Hv followed and established their task as achievement. Himali madam salute to you and your inspiration which you given to your both daughter. Good luck and best wishes for this Jijau’s achievement.

  4. *अभिनंदन , अभिनंदन मनापासून अभिनंदन*

    टीना आणि रिया डाबी, या भगीनीद्वयिंनी भारतीय प्रशासकीय सेवेत देशात अनुक्रमे पहिली ( २०१६ ) व पंधरावे स्थान ( २०२० ) पटकावून एक इतिहास घडवला आहे. नव्हे हा इतिहास हिमाली डाबी – कांबळे या तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या ध्येयवेड्या आईने दोन्ही मुलींचे शिक्षण काळातील योग्य नियोजन करून हा इतिहास घडवला. आजच्या काळात ही अतिशय महत्त्वाची भूमिका आणि मौलिक कामगिरी केली आहे. त्याबद्दल डाबी – कांबळे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.

    राजाराम जाधव,
    सहसचिव सेवानिवृत्त
    महाराष्ट्र शासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments