कवितेतील नायक व नाायिका शिक्षणानिमित्त काही काळ दूर होते व दोघांनाही एकमेकांचा ठावठिकाणा माहीत नव्हता. नायक मात्र एक दिवस अचानक नायिकेचा शोध घेत घेत तिच्यापर्यंत येऊन पोहोचलाच.
झाली जरी ताटातूट
शोधलेस तू मजला
मोहरलेला तो क्षण
कसा वर्णू मी तुजला ?
क्षणभर काही
सुचले नाही
मैत्रीणी पुसती
हा कोण गे बाई ?
हे सत्य असे की स्वप्न
एकटक मी बघत राहीले
तो स्पर्श रेशमी होता
तुजसवे मी पळाले
अजूनही स्मरतो
तो शीतल घोट काॅफीचा
बसलो होतो आपण दोघे
अनुभवीत क्षण प्रीतीचा
दैवगतीने झालो दूर
कधी न भेटण्यासाठी
पुनर्जन्म घेऊनी आपण
पुन्हा बांधूया प्रेमाच्या गाठी

– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका
नमस्कार सर, मान्यवरांचे पुस्तिका विषयी अभिप्राय खरोखर प्रेरणादायी आहेत. आपल्या हातून असेच लिखाण होवो ,मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर.आपणास त्रिवार नमस्कार ।
Very touching words