Friday, July 4, 2025
Homeसाहित्य"समाजभूषण" बोलक्या प्रतिक्रिया...

“समाजभूषण” बोलक्या प्रतिक्रिया…

महाराष्ट्र राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते, कासार समाजातील यशकथा सांगणारे “समाजभूषण” पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला मान्यवरांचा, वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

यातील निवडक, बोलक्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार……

१) वाचावे असे काही….!!
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी, श्री देवेंद्रजी भुजबळ यांचे “समाजभूषण” हे पुस्तक भुजबळ सरांनी मला सप्रेम भेट म्हणून पाठविले. त्यातील व्यक्तिमत्वे ही जनमानसावर प्रभाव टाकणारी आहेत. समाजातील सर्व वर्गातील … म्हणजे डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक … व्यक्तिमत्वे आहेत..
समाज उद्बोधक असे हे पुस्तक आहे. आपल्या संग्रही असावे आणि असलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. प्रा. स्मिता दगडे यांची निवड ज्या पद्धतीने औसा येथील महाविद्यालयात झाली, तशी सर्वत्र असावी हे माझे मत आहे. श्री. हेमंत रासने यांचा राजकीय प्रवास हा वाचनीय आहे.
एकूणच या पुस्तकात वृक्षप्रेमी, रणरागिणी, आदर्श शिक्षक, उद्योजक, गृहिणीपासून लेखिकेपर्यंत ची सर्व प्रकारची व्यक्तिमत्वे आहेत.
माझे पूर्ण पुस्तक वाचून व्हावयाचे आहे. कालच पुस्तक आले आणि त्यातील २ व्यक्तिमत्वे वाचून झाली.
समाजभूषण” हे नाव सार्थ आहे.
श्री. देवेंद्रजी यांचे कार्याला सलाम…🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
– अरुण पुराणिक, पुणे

२) अभिमानास्पद समाजभूषण
कासार समाज मुळातच लहान समाज आहे. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे बांगडी व्यवसाय किंवा भांडी व्यवसाय. त्यामुळे पुर्वी समाज बांधवांना पोटापाण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागत होते.

पण जसजशी शिक्षणामुळे प्रगती होत गेली तसतशी  समाजातील मुलांनीच नव्हे तर मुलींनी पण आपली प्रगतीपथावर घोडदौड सुरुच ठेवली. अर्थात यासाठी त्यांना पालकांचा पण भरघोस पाठिंबा मिळाला.

परिस्थितीशी झगडत समाजातील अनेक जणांनी यशोशिखरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला व समाजासाठी पण योगदान दिले. अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर त्यांची यशोगाथा समाजातील लोकांना समजावी व त्यांच्या पासून इतरांनी प्रेरणा घेऊन आपली प्रगती करावी या हेतूने समाजातील एक प्रभावी व्यक्तीमत्व व  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्याचे सेवानिवृत्त संचालक श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी  “समाजभूषण” हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या पुस्तकात समाजातील  प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, लेखिका, समाजसेवक-सेविका, चित्रकार, व्यावसायीक, उद्योगपती, पर्यटनप्रेमी, अशा अनेक व्यक्तिमत्त्वांची ओळख करुन दिली आहे.

उभयता श्री देवेंद्रजी व  सौ. अलका भुजबळ यांनी, त्यांचेशी असलेले आमचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन,  त्यांचे “समाजभूषण” हे पुस्तक मला घरी आणून भेट दिले. त्यांचे खुप खुप धन्यवाद.

या पुस्तकातील यशोगाथा वाचून माझे मन अभिमानाने भरून आले. पुस्तक वाचून मी प्रभावित झालो. प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे व संग्रही ठेवले पाहिजे असे मला वाटते जेणेकरुन आपल्याला व पुढील पिढीला प्रेरणा मिळेल.
– लक्ष्मीकांत विभूते, वाशी, नवी मुंबई. 🙏

३) वाचून मन प्रसन्न
मा. देवेंद्रजी भुजबळ,
आजच समाजभूषण हे बहुप्रतिक्षित प्रेरणादायी पुस्तक मिळाले व आपल्या कासार समाजातील थोर व्यक्तींच्या यशगाथा वाचून मन प्रसन्न झाले.
दि. २७/०९/२१ रोजी मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक व उद्योग मंत्री माननीय सुभाषजी देसाई यांच्या हस्ते श्री देवेंद्रजी भुजबळ लिखित समाजभूषण या पुस्तकाचे प्रकाशन झाले व कासार समाजाच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय सुवर्णाक्षराने लिहिला गेला.

कासार समाज संबंधित पुस्तक माननीय मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन होण्याची ही पहिलीच वेळ.
समाजभूषण या पुस्तकामध्ये कासार समाजातील कर्तृत्ववान, विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले तसेच उत्कृष्ट समाजसेवा केलेल्या व्यक्तींचे प्रेरणादायी वर्णन आढळते. कासार समाजातील उद्योजक, डॉक्टर, इंजिनीयर, समाजसेवक, अधिकारी यांचा जीवनपट लेखकांनी अतिशय सुंदर भाषेमध्ये प्रस्तुत केला आहे.

या सर्वांचा जीवनप्रवास वर्णन वाचताना आपल्या मनामध्ये प्रचंड ऊर्जा व प्रेरणा मिळते. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशीच संवेदना जागृत होते, हेच या प्रेरणादायी पुस्तकाचे यश आहे. पुस्तकाचे कव्हर अतिशय आकर्षक आहे. त्यावरील सर्व यशस्वी व्यक्तींची छायाचित्रे लक्ष वेधून घेतात. कासार समाजाच्या जडणघडण व प्रगतीमध्ये पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग समाजभूषण ने अधोरेखित केला आहे.
माननीय सुभाषजी देसाई यांनी संदेश दिल्याप्रमाणे समाजभूषण ने प्रेरित होऊन तरुण पिढीमध्ये घरोघरी समाजभूषण निर्माण व्हावेत हीच कालिका मातेच्या चरणी प्रार्थना.

समाजभूषण चे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ, आपण खरेच शासकीय सेवेतून निवृत्त झालात, पण समाजसेवेतून निवृत्त कधीच होऊ शकणार नाही. आपण दूरदर्शन, माहिती व प्रसारण विभाग, महाराष्ट्र राज्य, पत्रकारिता या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या नेत्रदीपक कामगिरीने एक वेगळा ठसा उमटवला आहे.
आपण संपादित केलेले समाजभूषण हे पुस्तक कासार समाजातील सर्व बंधू-भगिनी युवक युवती यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल व सर्वांसाठी एक पथदर्शक होऊ शकेल. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यप्रवण व्यक्ती शोधून त्यांच्यावरील यशोगाथा अतिशय कमी वेळेत तयार करून पुस्तक प्रकाशन करण्याचे कार्य आपल्या हातून घडले याचा सर्व कासार समाज बांधवांना अभिमान आहे.

सहसंपादिका, सौ अलकाताई भुजबळ यांची देवेंद्र जी यांना अखंड सावलीसारखी साथ व कथालेखन, संपादन व प्रकाशन यामधील सक्रिय सहभाग अतिशय महत्वपूर्ण आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीवर प्रचंड विजय मिळवून आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत. एमटीएनएल मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे व सर्वांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. लेखिका सौ रशमी हेडे आणि आणि भरारी प्रकाशनच्या लता गुठे यांचा सहभाग ही महत्वपूर्ण आहे.

आपले न्यूज पोर्टल
www.marathi.newsstorytoday.com
ही विविध विषयांनी समृद्ध असलेली मेजवानी आहे.
आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
– अशोक जवकर, मुंबई

४)समाजभूषण” घरोघरी हवे…
आदरणीय देवेंद्रजी भुजबळ साहेब,
सस्नेह नमस्कार.🙏🏻

आपले मनापासून खूप खूप अभिनंदन ! अभिनंदन !! त्रिवार अभिनंदन !!! 🌹🌹🌹🌹🌹

घरोघरी “समाजभूषण” घडावेत ह्या उपक्रमातुन मा. देवेंद्रजी भुजबळ यांचे कार्य खूप महान आहे.

या पुस्तकातील व्यक्तींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळून घरोघरी समाजभूषण घडतील, स्वयंप्रेरणेने आणि समर्पित भावनेने कार्य करणा-या लोकांना सर्वासमोर आणण्याचे कार्य या पुस्तकाने केले असे गौरवोद्गार उद्योग व मराठी भाषा मंत्री, नामदार मा. सुभाष देसाई साहेब यांनी काढून त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

अशा सेवानिवृत्त माहिती संचालक, अधिकारी, संपादक आणि पुरोगामी विचारवंत मा. देवेंद्र जी भुजबळ साहेब यांचे प्रेरणादायी कार्य म्हणजे, न भूतो न भविष्यती असेच आहे. साहेबांच्या महान कार्याला मानाचा मुजरा ! 👏

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणा-या विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणा-यांची यशगाथा या एकाच पुस्तकात युवकांना प्रेरणादायी ठरणार आहेत, त्यामुळे युवक यातून प्रेरणा घेऊन आपले भवितव्य उज्वल करणार आहेत आणि ते समाजाला एका उंचीवर नेतील याचा मला आत्मविश्वास वाटतो.🌹
याचे सर्वे सर्वा श्रेय, संपादक आदरणीय देवेंद्र जी भुजबळ साहेब यांचे आहे. त्यांचे आदर्श प्रेरणादायी लेख सर्व समाजबांधवापर्यंत पोहचत असतात.

तसेच साहेबांच्या सहचारिणी सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ यांनी कँन्सरवर मात करुन, कँन्सर रोग बरा होऊ शकतो, हे त्यांचे प्रेरक कार्य, त्यांनी लेखन केलेल्या काँमा या पुस्तकात मिळते. त्यामुळे मी मा. उभयता भुजबळ साहेबांचे ऋण व्यक्त करतो.

सदरचे समाजभूषण पुस्तक प्रकाशित करत असताना उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मा.उभयता भुजबळ साहेबांचे पुनःश्च खूप खूप आभार मानतो आणि त्यांना आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभावे ही भगवती चरणी प्रार्थना 🙏🏻
आपला
श्री कृष्णकांत सासवडे, सेवानिवृत्त शिक्षक
पिंपरी चिंचवड.

५) “समाजभूषण” पुस्तक मिळाले.
मनोगत छान लिहीले आहे..स्मिता दगडे आणि
हेमंत रासने यांच्यावरचे लेख आवडले. तसेच माझे गुरू, माझे मार्गदर्शक मध्ये श्री देवेंद्र भुजबळ यांनी संघर्ष करून मिळविलेले यश वाचून भारावून गेले.
जसे वाचेन तसे कळवेन…
– राधिका भांडारकर, जेष्ठ लेखिका, पुणे

६) असे आहे “समाजभूषण
कासार समाजातील विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेणाऱ्या स्त्री व पुरुषांच्या यशोगाथा “समाजभूषण” या पुस्तकात समाविष्ट आहेत. प्रत्येकाचा यशाचा, त्यांच्या जीवनाचा प्रवास वेगळा असला तरीही त्यांचे यशाचे रहस्य अगदी सहज सोप्या भाषेत पोहचवण्याचे प्रामाणिक काम लेखकाने केले आहे.

श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी ह्या पुस्तकाची निर्मिती करून जणू तरुणांना एक सुवर्ण पर्वणी निर्माण केली आहे. ही एक संधी आहे त्या सर्वांसाठी, जे उज्वल भविष्यासाठी आज पर्यंत कार्य करत आहेत.

पुस्तकातील प्रत्येकाची गोष्ट वाचताना जणू त्याचे चित्र डोळ्यासमोर क्षणात उभे राहते हाच लेखणीचा जिवंतपणा लेखकांनी जपला आहे.

हे पुस्तक वाचल्यावर याची जाणीव होते की चमत्कार वगैरे काही नसतो. सत्य हे अगदी स्पष्ट असते व कष्टाला कोणताही पर्याय नसतो. कोणतेही शॉर्ट कट नसतात.

सर्व यशस्वी लोकांमधील साम्य म्हणजे त्याची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, कामातील प्रामाणिकपणा व स्वतःचे ध्येय प्राप्त करण्यासाठी घेतलेली मेहनत जी त्यांना यशाच्या वाटेपर्यंत घेऊन जाते. एक वाचक म्हणून आवर्जून सांगू इच्छितो की हे पुस्तक आपल्या संग्रही असणे खूप महत्वाचे आहे. ते एक दार आहे जे अशक्य ही शक्य करण्याचे लढण्याचे व जिंकण्याचे सामर्थ्य देईल व कधीही कोणतीही वयात नव्याने सुरवात होऊ शकते, ही हिम्मत देईल.

श्री हेमंत रासने ह्यांची राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी सांगते की नेतृत्व उत्तम असले की ते कर्तृत्व जगाला दाखवून देते. कांचन दोडे यांना दिलेली उपमा रणरागिणी अगदी योग्यच आहे. तसेच दहावी नापास होऊन देखील जिद्दीने पुन्हा सुरवात करता येते, कोणतेही काम लहान कधीच नसते आपला स्वाभिमान जपणे जास्त महत्वाचे असते हे देवेंद्र भुजबळ ह्यांची यशोगाथा वाचताना जाणवते.

आनंद डांगरे ह्यांच्या हसतमुख व्यक्तिमत्वाचे उत्तम वर्णन, कॅन्सर वर निर्भीडपणे लढून जनजागृती करणाऱ्या अलकाताई भुजबळ ह्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. देव माणूस असणारे कुंदप काका काकू, शून्यातून स्वतःला सिद्ध करणारे राजेंद्र अचलारे असे एक न अनेक तेजोमय हिरे या पुस्तकात आहेत.

प्रत्येकाचे वर्णन अगदी सुंदर केले आहे. वाचून आनंद होतो. पुस्तक एकदा हातात घेतल्यावर पूर्ण वाचायचा मोह आवरता येत नाही. प्रत्येकाची कहाणी वेगळी. त्यांनी दाखवलेली हिम्मत व त्यासाठी अनेक त्याग समर्पण करून मोजलेली. हे पुस्तक वाचून वाचक अतिशय भावनिक होतो.

प्रत्येकाचे वर्णन करणे मला तरी शक्य नाही. त्यासाठी तुम्हालाच हे पुस्तक वाचायला पाहिजे असे मला मनापासून वाटते. समाजभूषण वाचल्यावर तुमचा दृष्टीकोन नक्कीच सकारात्मक होणार यात मात्र शंका नाही. भुजबळ सर तसेच सहलेखिका रश्मी ताई हेडे यांना पुढील स्वप्नपूर्ती साठी अनेक शुभेच्छा.
– शेषराव वानखेडे, जेष्ठ पत्रकार

७) खरेखुरे  “समाजभूषण”
श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब,
🌺🌺🌺🌺🌺🌺
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्या हस्ते घरोघरी “समाजभूषण” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंत्रालयात पार पडला. सदर पुस्तक भरारी प्रकाशना तर्फे प्रकाशित करण्यातआले तर महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती संचालक श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी संपादित केले असून यावेळी माहिती सचिव व महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे- माहिती संचालक (प्रशासन), श्री गणेश रामदासी- माहिती संचालक (वृत्त), श्री दयानंद कांबळे- उपसंचालक (प्रशासन), गोविंद अहंकारी, नितीन शिंदे SEO, श्रीमती अलकाताई भुजबळ व भरारी प्रकाशना तर्फे लता गुठे आदी मान्यवर प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते. खरचं सोहळ्याचे दृष्य पाहून मन खूप आनंदी झाले. श्री. देवेंद्रजी भुजबळ आपण फार मेहनत घेवुन अल्पावधीत या पुस्तकाची निर्मिती केली.

समाजातील कर्तुत्ववान व्यक्ती शोधून त्यांच्या कार्याची माहिती आजच्या तरुणाईला व्हावी आणि त्यापासून प्रेरणा, स्फूर्ती व ऊर्जा मिळावी या उद्देशाने आपण केलेला हा प्रयत्न निश्चितच भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी उपयोगी ठरेल.

समाजात किती तरी अश्या व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या विश्वाची निर्मिती शून्यातून केली त्यांनी घेतलेली कष्ट, मेहनत त्याच बरोबर समाजासाठी दिलेले योगदान व प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते सुखी संपन्न बनले परंतु विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले सामाजिक व राजकीय क्षेत्रात ही आपला उत्तम ठसा उमटविला ही प्रचंड कार्यक्षमता पाहून मन थक्क व्हायला होतं अगदी बांगडी व्यवसायापासून ते उद्योजका पर्यंत केलेली प्रगती ही निश्चितपणे भावी पिढीला प्रेरणादायी, स्फूर्तिदायी व मार्गदर्शक ठरेल.

अश्या या आदर्श व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजा समोर आणून किंबुहूना प्रसिद्धी दिली. त्यांनी आपल्या कार्यातून साध्य केलेला विकास, उत्कर्ष आणि उन्नती व समाजाच्या प्रगतीसाठी केलेले प्रचंड प्रयत्न प्रकाश झोतात आणले. या पासून भावी पिढीला एक नवी दिशा मिळेल एक नवा आदर्श निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

समाजभूषण” या पुस्तकाची आपली संकल्पना भावी पिढीच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल त्याच बरोबर ते चांगले उद्योजक तयार होण्यास मदत होईल यातूनच समाजाची मोठी प्रगती साधता येईल असच हे पाऊल आहे. अश्या या आपल्या महान कार्यात श्रीमती अलकाताई यांचे ही मोलाचे योगदान लाभले असून समाजभूषण शोधून काढण्यात त्यांची ही संवेदनशीलता लक्षात येते त्यांचे ही मनःपूर्वक आभार.
आपण ज्या तळमळीने “समाजभूषण” हे पुस्तक संपादित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिले या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺
– दीपक ज. जवकर, डोंबिवली.

आपल्याला ही समाजभूषण पुस्तक हवे असेल तर कृपया संपर्क साधावा.
आपला
देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments