‘स्पर्शज्ञान’चा या वर्षीचा ब्रेल दिवाळी अंक गुरुवर्य बाळासाहेब वाघ यांच्याहस्ते नुकताच पुणे येथे अनौपचारिकरित्या प्रकाशित झाला.
अंकाबद्दल आणि ब्रेल लिपीबद्दल जाणून घेतल्यानंतर तो भला मोठा पांढऱ्या शुभ्र कागदावरील उठावदार ठिपके असलेला अंक पाहताना आणि त्यावर हळूवारपणे हात फिरवताना वाघ सर भारावून गेले… भावूक होऊन त्यांचेच विद्यार्थी असलेल्या संपादक श्री स्वागत थोरात यांचं कौतुक करताना ते म्हणाले, “मोठं काम आहे हे…… जगण्याचा अर्थ कळलाय तुला स्वागत !” यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
स्पर्शज्ञान
“स्पर्शज्ञान” चा हा दिवाळी अंक “आठवणीतील आठवणी विशेषांक” असून तो दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यातील अंध वाचकांपर्यंत टपालाने पोहोचेल. या अंकात विविध मान्यवरांनी लेखन केले आहे.
हा अंक फक्त ब्रेल लिपीत असल्याने तो तुम्हाला एखाद्या अंध व्यक्तीकडून वाचून घ्यावा लागेल.
२१२ पानांचा भरगच्च दर्जेदार साहित्य असलेला हा ब्रेल दिवाळी अंक ६००/- ₹ भरून आपण तुमच्या माहितीतील किंवा संस्थेच्या प्रतिक्षा यादीतील एका अंध व्यक्तीस भेट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी 9004711474 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ 9869484800