फक्त झाले ठराव शोकाचे
पंचनामे उजाड गावाचे
मुखवट्यांचे सराव इतके की
चेहरे हे उगाच नावाचे
कोसळू दे मळभ अता सारे
फक्त कारण हवे बरसण्याचे
मोजणी का जुन्या गुन्ह्यांची त्या?
उघड खाते नव्या हिशोबाचे
शीड नाही जरी जहाजाला
प्रेम वाटे तरी प्रवासाचे
त्या फुलाचा स्वभाव फुलण्याचा
मात्र होते निमित्त चैत्राचे
– रचना : समीर जिरांकलगीकर, कॅनडा