जय जय अंबे नव दुर्गे
गातो तुझी गे आरती
दर्शनाने तुझ्या गं माते
आनंदाला ये भरती……ध्रु.
मातला होता महिषासूर
त्रासून गेले ईश्वर
हैदोस घातला असूरांनी
चंड मुंडांनी भरपूर ।१।
स्वर्ग पाताळ धरतीवरी
उडाला थरकाप
करिती राक्षस अत्याचार
धजती कराया पाप ।२।
साधू संत देवही आले
गा-हाणे घेऊन
सज्ज जाहली वाघावरती
स्वार तू होऊन ।३।
शौर्याने धैर्याने करिशी माते
आरंभ युद्धाला
नवरात्रीच्या शुभ पर्वात
मारीले महिषासूराला ।४।
तिन्ही लोकी झाला माते
तुझा गं जयजयकार
अंबे अंबिके कालिमाते
तूच विश्वाची तारणहार ।५।
प्रेम सेवा त्याग भक्तीचा
लागो आम्हा लळा
प्रार्थितो माते तुजला आम्ही
मार कोरोनासूराला ।६।

– रचना : राजेंद्र वाणी
आदरणीय राजेंद्र वाणी सर आणि आदरणीय देवेंद्र भुजबळ सर नमस्कार आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आरती नवदुर्गेची फार सुंदर आहे आणि भुजबळ सरांनी तिला मांडणे दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि राजेंद्र वाणी सरांचे अभिनंदन