माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्य संकुलात आज
’वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, ज्येष्ठ साहित्यिक श्री. पियुष नाशिककर, डॉ. सोनाली कुलकर्णी- गायकवाड, श्री. श्रीराम वाघमारे, श्रीमती भाग्यश्री गुजर, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, डॉ. सुनील फुगारे, श्री. संदीप कुलकर्णी, डॉ. संदीप गुंडरे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. दैनंदिन कामकाजाबरोबर वाचनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनातून आपला आत्मविश्वास दृढ होतो. विचार प्रगल्भ होतात. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो असे त्यांनी सांगितले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक श्री. पियुष नाशिककर, डॉ. सोनाली कुलकर्णी- गायकवाड, श्री. श्रीराम वाघमारे, श्रीमती भाग्यश्री गुजर यांनी वाचन संस्कृती वाढावी यासाठी संकल्प करावा, दररोज किमान चार पाने वाचावीत, नियमित वाचन केल्याने मन सुंदर होते, वाचन ही एक कला आहे ती सर्वांनी आत्मसात करावी असे सांगितले. याप्रसंगी त्यांच्यातर्फे कवितांचे सादरीकरण व अभिवाचन करण्यात आले.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, श्रीमती प्रतिभा बागुल यांनी अभिवाचन केले.
या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर यांनी आभार मानले.
कोव्हिड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कार्यक्रमात पालन करण्यात आले.
– टीम एन एस टी, 9869484800