नंदूरबार जिल्ह्यातील भांगरापाणी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन काल
उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख‘ या पुस्तकाची, श्रीमती आनंदी वळवी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन श्री .जी. बी. वळवी, श्री . सुनिल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री . संजय अहिरे यांनी ‘वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल‘, या संकल्पना उदाहरणे देऊन स्पष्ट केल्या. शिक्षक व विद्यार्थी यांनी पुस्तकांचे वाचन केले.

याचबरोबर जागतिक हात धुवा दिनानिमित्त श्रीमती शुभांगी वसावे यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले व हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांकडून देखील कृती करून घेतली.
कार्यक्रमाला श्री.एम. एन. तडवी, श्रीअविनाश वसावे , श्रीमती रिना तडवी व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोजके विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.दलपत पाडवी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कालुसिंग वसावे यांनी सर्वांना ‘वाचन प्रेरणा दिना‘च्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
– टीम एनएसटी 9869484800