असाही एक दिवस येतो
सुखाच्या सरी वर्षून जातो
भूत भविष्य सारे काही
त्याबरोबर वाहून नेतो… असाही
असाही एक दिवस येतो
गत स्मृतींना हलवून जातो
कटू गोड स्मृतीमालेत
आपल्यालाही गुंफून घेतो..
असाही एक दिवस येतो
मनाला उत्साहित करून जातो
रेंगाळलेल्या कामांना ही
त्या भरात वेग येतो..
असाही एक दिवस येतो
घोर दुःखात बुडवून जातो
पुढला दिवस उगवूच नये
हीच जाणीव उरवून जातो..असाही एक

– रचना : सुनंदा पानसे
असा ही एक दिवस येतो
शब्दांच्या वर्षाव करुन जातो
सुनंदा ताईंना कवितेच्या ओळी
पुर्णपणे गुंफून जातो
सुंदर शब्दांत गुंफलेली कविता