वाचक लिहितात…
नमस्कार, मंडळी.
माय देशापासून दुर जाऊनही माणूस मनाने मायदेशीच कसा असतो, हे नव्या दमाचे लेखक ऑस्ट्रेलिया वासी श्री सर्जेराव पाटील यांनी त्यांच्या “आपट्या च्या पानांचं ऑस्ट्रेलियन व्हर्जन ” मधून खुसखुशीत पणे छान दाखवून दिलं.दसरा झाला, आता वेध दिवाळीचे ☺️
पाहू या, या आठवड्यात वाचक काय लिहितात !
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक
साहसी अनिल वसावे
अनिल वसावे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन,
आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य ,देश यासाठी
अभिमानास्पद कामगिरी.
धन्यवाद मित्रा.
– अशोक केरू गोरे
ओठावरलं गाणं
काही गाणी अशी आहेत की ती ऐकून जरी बराच कालावधी लोटला असला तरी त्याची आठवण होताच ते नकळत ओठावर येते. असंच हे अतिशय हृदयस्पर्शी गीत. श्री. विकास भावे यांनी केलेल्या यथायोग्य रसग्रहणातून गाण्यात वर्णन केलेले सर्व भाव पुनर्जीवित झाले ! खूप सुंदर शब्दांकन !! 👌👌👍👍💐
– रवींद्र खासनीस
ओठावरलं गाणं
विकासजी
गदिमांचे खूप सुंदर भक्तीगीत…माणिक वर्मा यांनी गायलेले…
भाबड्या भक्ताची देवावर श्रद्धा आणि विश्वास असल्यावर देवालाही त्याच्या धावेस हाक द्यावीच लागते…
अश्या अर्थाचे गीताचे आपण खूप सुंदर रसग्रहण केलेत
त्यामुळे अजून छान समजण्यास मदत होते.
👌🙏🌹
– विजय म्हामुणकर
आ प ट्या च्या पा नां चं ऑ स्ट्रे लि य न व्ह र्ज न
अप्रतिम लेख !
विजयादशमीचे दिवशी सीमोल्लंघनाचे महत्त्व असते. आपल्यासारख्या परदेशी राहणाऱ्या मंडळींनी कर्म करण्याचे निमित्ताने सीमोल्लंघन केलेले आहेच. त्यात अश्या निराळ्या version च्या असल्या तरी आपल्या संस्कृतीच्या खुणा दिसल्या तर आनंद द्विगुणित होतो.
आपली शोधक वृत्ती देखील दिसते ह्यात.
मनःपूर्वक आभार 🙏🏻
– Gauri Joshi Kansara
मस्त कथा – किंचित लांब आहे – पण ‘पहिला प्रयत्न आहे , स्तुत्य आहे. मी हि हे सर्व middle ईस्ट आणि आफ्रिकेत अनुभवलं आहे. वाचतांना स्मरण रंजनात गुंतलो
– प्रवीण
आ प ट्या च्या पा नां चं ऑ स्ट्रे लि य न व्ह र्ज न
वाह, एकदम मस्त वर्णन केलं आहे. ही कोणची पान आहेत हे शोधून काढायची उस्तुकता जागी झाली आहेच शिवाय इथे म्हणजे, यु.के. मधे मिळतील का ते बघायचे ठरवले आहे.
– लीना फाटक
कथेतील वास्तविकता भावली. छान.. मस्त !
– प्रकाश मळेवाडकर
मस्त लेख ! ॲास्ट्रेलिअन व्हर्जन भारीच !
– शिल्पा कुलकर्णी
‘ते’ काय वाचतात ? भाग – १
अतिशय उत्तम लेख, मेघना !
– प्रतिभा सराफ
‘ते’ काय वाचतात ही कल्पनाही चांगली आणि लेखही छान !
– श्रध्दा जोशी
खूप छान लेख 👌
– दीपक म कांबळी
वाह छान लिहिले आहे, प्रत्येकाचा वाचनाचा दृष्टिकोन वेगवेगळा. किरणे वेगळी , घेतलेला बोध पण वेगळा,आणि त्यामुळेच एवढे निरनिराळे दर्जेदार लेखन, साहित्य आमच्या पर्यंत पोहचतं.
– अश्विनी कुंटे
खूप छान लेख, एक वेगळीच कल्पना, लेखक काय वाचतात हे जाणून,आपल्या वाचनाची दिशा ठरवायला छान मदत !!!
– श्रीपाद इनामदार
कथेतील वास्तविकता भावली. छान.. मस्त !
– प्रकाश मळेवाडकर
आरती नव दुर्गेची
आदरणीय राजेंद्र वाणी सर आणि आदरणीय देवेंद्र भुजबळ सर नमस्कार आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आरती नवदुर्गेची फार सुंदर आहे आणि भुजबळ सरांनी तिला मांडणे दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि राजेंद्र वाणी सरांचे अभिनंदन
– मदन लाठी
थोर जयंतराव टिळक
बरीच नवीन माहिती समजली .
– प्रवीण बरदापुरकर
सहस्रभोजनेसाहेब ९७ वर्षांचे झाले हे ऐकून फार आनंद झाला. तो वृत्तांतही छान आहे. त्यांचे फोटोही छान आहेत.
सहस्रभोजनेसाहेबांनी वयाचे शतक पूर्ण करावे ही शुभेच्छा! त्या कार्यक्रमाचा योग जुळवून
आणल्याबद्दल शरद चौधरी, अनील गडेकर, विनायक तडसे यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. आणि हा वृत्तांत जगभर पोचवल्याबद्दल तुझेही अभिनंदन🌹
राधाकृष्ण मुळी यांचा शांता शेळके यांच्यावरील लेखही फार छान आहे…
धन्यवाद आणि शुभेच्छा💐
– प्रल्हाद जाधव, निवृत्त माहिती संचालक मुंबई
धन्यवाद साहेब, नवोदित लेखन करू इच्छिणाऱ्या तरुणांचा प्रेरणा दिल्याबद्दल व अनिल वसावे सारख्या आदिवासी गिर्यारोहकाला आपल्या माध्यमातुन जगासमोर आणण्याच्या दृष्टीने प्रकाशित केलेल्या बातमी बददल आपले व आपल्या न्यूज स्टोरी टुडेचे धन्यवाद .🙏🏻👍🏻
– संजय अहिरे, नंदूरबार
ब्रेल दिवाळी अंक प्रकाशित करण्याची कल्पनाच खूप महान वाटली.
समाजातील अंध साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.
स्पर्शज्ञान या दिवाळी अंकांसाठी माझ्या अगणित शुभेच्छा !!💐
– राधिका भांडारकर, पुणे
आदरणीय सर नमस्कार, विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त हार्दीक शुभेच्छा,
फर्ग्युसन महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश ही बातमी वाचली. अशीच घटना 2018 मध्ये धुळे जिल्ह्यात घडली आहे. एकूण पाच विद्यार्थी यशस्वी झाले. त्यापैकी एक मयूरभंज (ओरिसा), एक बसवकल्याण (कर्नाटक)येथे सहायक जिल्हाधिकारी, तर अन्य तीन अन्य सेवांमध्ये सेवारत आहेत.
– गोपाळ साळुंखे, धुळे
आपट्याच्या पानाचं आस्ट्रेलीयन व्हर्जन… मस्तच…
– श्याम विभूते, नवी मुंबई.
आपट्याच्या पानांच ऑस्टेलियन व्हर्जन … सर्जेराव पाटील यांचा लेख वाचला. वाचून मन प्रसन्न झाले . खरे तर म्हणतात विदेशात गेल्यावर भारतीय संस्कृती लोक विसरतात. पण सर्जेराव पाटील व त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून किंवा सर्जेराव पाटील सारख्या व्यक्तीमुळे आजही भारतीय संस्कृती मोठ्या डोलाने उभी आहे.आपट्याच्या पानांचं ऑस्टेलियन व्हर्जनची अचानकपणे झालेली भेट, ते सापडल्या नंतर त्यांचा व त्यांच्या परिवाराचा आनंद हा खरोखरच, खऱ्या सोन्यापेक्षाही महान आहे. त्यांची लेखन शैली , मनाची पकड घट्ट करणारी वाक्य रचना ही अतिशय सुंदर आहे. धन्यवाद सर्जेराव पाटील सर व भुजबळ साहेब 🙏🏻
– संजय अहिरे, नंदुरबार
ते काय वाचतात भाग 1 मस्तच, नेहमीप्रमाणे वेगळाच विषय मेघनाताई👍 बाकीच्या भागांची उत्सुकता आहे.
– वर्षा फाटक, पुणे
आपट्याच पान खुमासदार शैलीत लिहिले आहे. मजा आली वाचतांना.
—- वर्षा फाटक, पुणे
👌
मलेशियामध्ये देखील अशी झाडं आहेत
आम्ही आल्यानंतर २००२ मध्ये आमच्या घराच्या बाहेरच एक झाड होतं. अगदी तसंच !!!
आणि आम्हीदेखील तोच विचार करत होतो
मलेशियामध्ये देखील आपट्याचं झाड 😃
– प्रशांत टाकसाळे, कुआलालंमपूर, मलेशिया
न्युज स्टोरी टुडे मधील, प्रा डाॅ किरण ठाकुर
यांचा लेख वाचला आणि त्यानी चाळीस वर्षांपूर्वी गंगेच्या जल प्रदुषण विषयी वस्तुस्थिती लिहिली खरंच नद्या कुठल्याही असो त्या प्रदुषित करलायला आपण मागे पुढे पहात नाही आता नद्या चे प्रात्र बदलत चालले आहे नद्या पवित्र आहे म्हणून खराब होणार नाही असे उत्तर दिले जात असले तरी या फसव्या उत्तराने फसगत होते
खरच बार माही वहाणारया नद्या जशा आटल्या तसी समाजाभिमुख पत्रकारीता देखील आटली
नको त्या विषयाला पाणी लाऊन घातक विषयाला खत पाणी घातले जाते मात्र डाॅ ठाकुर यानी 41 वर्षीपुर्वी केलेले चित्रन आता आपण बदलुया अण पाण्याच्या थेबाचा आदर करुया मग तो पावसाचा असूद्या किवा डोळ्यांतील
– शिवाजी घाडगे पत्रकार, राहुरी
राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित
मा प्रा.डॉ. किरणभाऊ,
सप्रेम नमस्कार।
प्रदूषणमुक्त गंगेसाठी जगाच्या वेशीवर
विदारक वास्तव मांडणारा जिंदादिल
पत्रकार म्हणून आपल्या लेखणीने जे
कार्य केले त्या लेखणीला सलाम।
थोडक्यात लिहल पण ते शब्दच खूप खूप
बोलून गेले। लोकसत्ताच्या पहिल्या
पाना पासून सुरुवात केली तर शेवटचं पान
कमी पडेल इतकी ही माहिती आहे.
मी 1980ला दिल्लीत असतांना आग्र्याची
यमुना बघितली, पाण्यावर प्रेत तरंगलेली
त्यावर कावळे ताव मारतांना अक्षरशः
भयंकर किळस आलेली आजही आठवते।
संसदेतील विरोध हा होणारच ! हे विषय
म्हणजे त्यांची दुकानदारी चालण्यासाठी
उपयोगी पडणारे आहेत।असो।
याविषयावर भेटी अंती बोलू।
पुनश्च आपल अभिनन्दन।
अहो! एक राहूनच गेलं, आमच्या घरात
एक महिन्यापूर्वी गंगेच पाणी असलेल एक
छोटस कॅन एकाने आणून ठेवल।
आज आपला लेख पुन्हा वाचतांना ते
समोर दिसल।आता आपला हा लेख
परिवारातील सर्वांना पाठवतो व आमच्या
कडे गंगेच पवित्र तीर्थ आहे एव्हढेच
सांगतो.
आपलाच
– अमर पांडे, सांगली।
बातमीचा एवढा परिणाम होतो! यामुळे तुमच्या कामाचा अवाकाही समजतोय. Exciting आहेत तुमचे अनुभव. अजुन खूप एकायला आवडेल.
बातमीचा एवढा परिणाम होतो! यामुळे तुमच्या कामाचा अवाकाही समजतोय. Exciting आहेत तुमचे अनुभव. अजुन खूप एकायला आवडेल. डॉ – – – –सचिन वारघडे
वाह, वाचताना सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं सर. आता कीती किती बदल झाला आहे पत्रकारितेत. तुम्ही किती सहजपणे काम करीत होतात , फारच छान अनुभव कथन, आनंद वाटला सर.
– डॉ जोशी