अंधार दाटला चोहीकडे
मन झाले उदास
सूर आले भरभर जुळुनी
छेडिताना बिभास
प्रकाशल्या दशदिशा
बेधुंद मी खयालात
नुरले भान कशाचे
हरवले स्वर तरंगात
कलरव चाले विहगांचा
उडती स्वैर आकाशी
स्वच्छंदपणे भूमीवरती
खेळते मी सुरांशी
नव्हते कसले बंधन
वेळ काळाचे
जादुभर्या स्वरांना
फक्त कवटाळायाचे
सुरात असते भक्ति
सुरात असते शांति
विसरते देहभान
लाभे कशी मनःशांति

– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका