नमस्कार, मंडळी.
आपल्या पोर्टलमुळे देश विदेशातील वाचक, लेखक, विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येत आहेत, याचा मनस्वी आनंद होत आहे.
” हे विश्वची माझे घर ” ही उक्ती सार्थ ठरत आहे. हे अनुबंध असेच वाढत राहो,ही मनःपूर्वक इच्छा आहे.
या आठवडयातील प्रतिक्रिया नक्कीच उद्धबोधक आहेत. सर्व पत्र लेखकांना मनापासून धन्यवाद.
– देवेंद्र भुजबळ, संपादक
In this critical situation your advice to all youngster is very important that can give instinct to them as well as do write and then write is very valuable mantra given bo Alkatai. So both are doing well job in your retirement life. God may give you strength, corough and good health. Hv a Good Friday. BSG.
– BS. GAIKWAD
सुजाता कोंडी गिरी- राजपूत यांची जिद्दीची प्रेरक कहाणी वाचून मन हेलावून गेले आहे. प्रत्येकाने यापासून धडा घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. सौ. अलका भुजबळ मॅडम यांनी घेतलेली मुलाखत ऐतिहासिक ठरणार आहे.
– विलास बाबुराव सरोदे
ना तमा आता तमाची…खूपच छान रसग्रहण.या प्रेमामुळे शारदीय चांदणं अधिकच दुधाळ झाल.मंद आहे …धुंद वारा… सागरी किनारा… अशातच प्रेमीकांना बळ मिळत.
चांदणं जणू त्यांनाच भैटायला आलं आहे तमा कशाची मग ? छान रसग्रहण
– डाॕ. अंजुषा पाटील
पुस्तक काहीही असले तरी त्याच रसग्रहण वाचाव ते फक्त विकास भावे सरांच्या शब्दात…. सहज, सोप्या भाषेत वाचकाला अर्थ सांगण्याची तुमची शैली एकमेवाद्वितीय …. कधी माहित नसलेली गाणी समजतात तर कधी ऐकीव गाणी अर्थ लेवून परत एकदा समोर येताय आणि मग ती परत परत गुणगुणावीशी वाटतात…👏😍👏
– वीणा रारावीकर
सौ.सुजाता राजपूत मॅडम यांच्या जिद्द, चिकाटी, आणि अपार मेहनतीला मानाचा मुजरा व सलाम
– श्री. अंकुशराव तानाजी
खुप भावपूर्ण, मनाला सद्गदित करणारा लेख. माझ्या जवळच्या दोन मैत्रिणी गेल्यावर्षी दिवंगत झाल्या. एक इंग्लिश मैत्रिण जूनमध्ये जग सोडून गेली व नुकतीच, ५ आॅक्टोबरला खुप जवळीक असलेली मैत्रीण देवाघरी गेली. त्यामुळे सुनिता नाशिककरांच्या भावना समजू शकते.
– Lina Phatak, Warrinton, UK
ओठावरचे गाणे
खूप सुंदर . हे गाणं फारसे कोणी ऐकले नसावे.
पण तुम्ही ह्या माध्यमातून हे गाणं
आमच्या पर्यंत पोचवले
– वैभव साटम
क्षणिक अपयशाने खचू नका – देवेंद्र भुजबळ
क्षणिक अपयशाने खचू नका! मोलाचा संदेश!
अभिनंदन! श्री. व सौ. भुजबळ. तुमचे दोघांचे कौतुक करावे, तेवढे कमीच! तुमच्या कडून मिळणारे मोलाचे मंत्र,जनजागृतीसाठी अमृत ठरावे!
– सौ.वर्षा म.भाबल.
अनोखे मिलन……
अनोखे मिलन खुपच छान लेख. धन्यवाद सर.
– सोमनाथ साखरे
असाही एक दिवस
असा ही एक दिवस येतो
शब्दांच्या वर्षाव करुन जातो
सुनंदा ताईंना कवितेच्या ओळी
पुर्णपणे गुंफून जातो
सुंदर शब्दांत गुंफलेली कविता
– ओमप्रकाश
आ प ट्या च्या पा नां चं ऑ स्ट्रे लि य न व्ह र्ज न
Masta khuskhushit lekh.. sagala dolyasamor ubha rahila .. dasara safal zala mhanayacha ! 😄
– Madhura Desai
‘ते’ काय वाचतात ? भाग – १
सुंदर विषय आणि लेख सुद्धा माहिती देणारा.. वाचनानंद हाच मोठा आनंद आहे.
– सौ नूतन बांदेकर
आ प ट्या च्या पा नां चं ऑ स्ट्रे लि य न व्ह र्ज न
This is Bauhinia Variegata. Common name: Orchid Tree.
– Yogesh G. (USA)
‘ते’ काय वाचतात …? भाग – २
धन्यवाद मेघनाताई, तुमचे दोन्ही लेख वाचले. व आवडले. आपण बऱ्याच वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य वाचतो पण ते सर्व कोणते व कोणाचे साहित्य वाचतात याची मला उत्सुकता होती. आपल्या लेखांमुळे ती माहिती मिळाली. धन्यवाद.
– Lina Phatak, Warrinton, UK
वाह…त्या त्या लेखकाच्या वाचनाचा समृद्ध आढावा भावला.
– Ramdas khare
मेघना… अतिशय सुंदर लेख लिहिला आहेस आणि त्यात मलाही सामावून घेतलेस, याबद्दल मनापासून धन्यवाद!
– Pratibha Saraph
मेघना जी, नक्कीच एक आगळी वेगळी आणि छान संकल्पना आहे ही! लेखक, लेखिका आणि त्यांचं साहित्य वाचायला उद्युक्त करते! साहित्यातील नव निर्मिती सहज कळून येते. धन्यवाद!
– मनोहर मंडवाले, कल्याण