Saturday, July 12, 2025
Homeबातम्याआय.टी.आय. संधी

आय.टी.आय. संधी

महाराष्ट्रात अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे. त्यामुळे प्रशिक्षित प्रमाणपत्र धारकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

यापूर्वी राज्यातील शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांची संधी हुकलेली आहे अशा इच्छूक उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने आॕनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षण महासंचालनालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. अशा उमेदवारांनी दि.२६ आक्टोंबर पर्यंत itiadmissions@dvet.gov.in किंवा www.dvet.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा .

अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी दि. २७ ऑक्टोबरला संबंधित संस्थेत लावण्यात येईल. दि.२८ आॕक्टोंबर पासून रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल. संकेतस्थळावर सूचित केलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिल्प कारागीर योजना, आदिवासी उपाययोजना, अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिकरण योजना, अनुसूचीत जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली आहे.

समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीचा इच्छूक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा. औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्था स्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ अवश्य घ्यावा.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी औ.प्र.संस्था भायखला आग्रीपाडा मुंबई ११ येथे संपर्क साधावा असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा.) संचालक श्री. दि.अ. दळवी यांनी केलेले आहे.

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments