९० देगलूर (अजा) विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र विधानसभेची पाेटनिवडणूक २०२१ पार पडत आहे.
मतदान उद्या शनिवारी दि. ३० ऑक्टोबर २०२१ राेजी हाेत आहे. या निमित्ताने हा विशेष लेख……
आपण जेथे वास्तव्य करताे तेथे स्वत:बराेबरच देशाच्या
विकासाकरिता तसेच राज्याच्या कायदे करण्याच्या प्रक्रियेत, राज्य सुव्यवस्थित चालविण्यासाठी आपल्या मनाप्रमाणे लाेकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क लोकशाही राज्य व्यवस्थेत मतदारांना मिळात असतो.
त्यामुळे आपले हक्काचे मत देऊन विधानसभेत आपल्या पसंतीच्या उमेदवारास संधी उपलब्ध करून देता येते. म्हणूनच मतदारांनी मतदानाच्या दिवशी स्वत: हाेऊन मतदानाचा हक्क बजावणे देशाच्या व राज्याच्या हिताचे आहे.
९० देगलूर (अजा) विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र विधानसभेची पाेटनिवडणूक २०२१ पार पडत आहे. या मतदार संघात देगलूर व बिलाेली हे दोन तालुके समाविष्ट आहेत मतदान शनिवारी दि. ३० आक्टोबर २०२१ राेजी हाेत आहे. नमुना ७-अ प्रमाणे
१. अंतापूरकर जितेश रावसाहेब, इंडियन नॅशनल काँग्रेस
२.साबणे सुरेश पिराजीराव, भारतीय जनता पार्टी,
३. उत्तम रामाराव इंगाेले वंचित बहुजन आघाडी,
४. केरूरकर विवेक पुंडलिकराव जनता दल(सेक्युलर)
५. प्रा.परमेश्वर शिवदास वाघमारे, बहुजन भारत पार्टी
६. डी.डी. वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खाेब्रागडे)
७. अरूण काेंडिबाराव दापकेकर, अपक्ष
८. गजभारे साहेबराव भीवा , अपक्ष
९. भगवान गाेविंदराव कंधारे, अपक्ष
१०. माराेती लक्ष्मण साेनकांबळे, अपक्ष
११. वाघमारे विमल बाबूराव, अपक्ष,
१२. काॅ.प्रा.सदाशिव राजाराम भुयारे, अपक्ष
असे बारा उमेदवार उभे आहेत.
मतदार यादी प्रसिद्धीनुसार दि. १५ जानेवारी २०२१ राेजी ९० देगलूर विधानसभा मतदार संघात एकूण मतदार २९४०३५ असून, पुरूष मतदार १५१७७९ तर स्त्री मतदार १४२२५६ आहेत.
मतदान केंद्र पहाता, प्रमुख मतदान केंद्र ३४६ सहाय्यकारी मतदान केंद्र ६६ असे एकूण ४१२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक मतदान केंद्राध्यक्ष, तिन मतदान अधिकारी नियुक्त आहेत असे ४१२ मतदान केंद्रासाठी १६४८ अधिकारी कर्मचारी आहेत तर राखीव अधिकारी कर्मचारी ३२८ नियुक्त आहेत. या मतदार संघात एकूण २९ झाेन असून २९ झाेनल अधिकारी नियुक्त आहेत तर १० राखीव झाेनल अधिकारी नियुक्त आहेत.
ईव्हीएम मशीन तपासणी अंती बॅलेट युनीट १२०६, कंट्राेल युनीट ९६८ आणि व्हीव्हीपॅट ९९३ आहेत
मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी यांचे १२ व २२ आक्टोबर राेजी प्रशिक्षण पूर्ण झाले तर अंतिम प्रशिक्षण २९ तारखेला आहे.
निवडणूक प्रक्रियेत समन्वय ठेवण्यासाठी एकूण २० कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्यात अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) दिपाली माेतीयळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (राेहयाे) संताेषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी देगलूर शक्ति कदम, अपर पाेलीस अधीक्षक निलेश माेरे , जिल्हा सूचना अधिकारी (एनआयसी) प्रफुल्ल कर्नेवार , अतिरिक्त आयुक्त नांदेड मनपा बाबासाहेब मानाेहरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकडे, राज्य शुल्क उत्पादन अधिकारी अतुल कानडे, तहसीलदार विजय अवधाने, ज्याेति चव्हाण, जिल्हा काेषागार अधिकारी अभय चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निलकंठ भाेसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनाेद रापतवार व शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सचिन गिरी हे आहेत. तहसिलदार देगलूर बिलावल व मुख्याधिकारी न प बिलाेली हे एआरओ आहेत.
निवडणूक निरिक्षक म्हणून श्री पंकज (आयएएस) खर्च निरिक्षक श्री शुक्ला (आयआरएस), पाेलीस आब्जर्वर गाेपेश अग्रवाल (आयपीएस) यांची नियुक्ती निवडणूक आयोगाने केली आहे.
एमसीएमएसी समिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यात उपविभागीय अधिकारी विकास माने, संचालक डॉ दिपक शिंदे माध्यम संकुल स्वाराती विद्यापीठ, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे हे सदस्य व सचिव जिल्हा माहिती अधिकारी विनाेद रापतवार हे आहेत.
जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पाेलीस अधीक्षक प्रमाेद शेवाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
मतदारांना मतदान करणे साेयीचे व्हावे म्हणून मतदारांनी पुढील ११ पैकी एक पुरावा साेबत बाळगणे आवश्यक आहे
१. आधार कार्ड,
२. मनरेगा जाॅब कार्ड
३. बॅंक पासबुक फाेटाेसहीत
४. आरोग्य स्मार्ट कार्ड
५. ड्रायव्हिंग परवाना
६. पॅन कार्ड
७. एन पी आर स्मार्ट कार्ड
८. इंडियन पासपोर्ट
९. पेन्शन कागदपत्र फाेटाेसह
१०. कार्यालयीन ओळखपत्र
११. लाेकप्रतिनिधी यांनी जारी केलेले ओळखपत्र.
आपल्याजवळ मतदान कार्ड किंवा मतदान चिठ्ठी आहे पण मतदार यादीतून नाव वगळले गेले तर आपण मतदान करू शकत नाही. जर कोणी तुमचे मतदान केले तर काय करावे: जर आपणाला समजले की आपले मत अगाेदरच दिले गेले आहे तर आशा परिस्थितीत कायदा तुम्हाला टेंडर वाेट देण्याचा अधिकार देते आपल्याला एक टेंडर्ड मतपत्रिका दिली जाते, आपल्याला टेंडर्ड मताच्या यादीवर सही करावी लागते, आपल्या पसंतीच्या उमेदवारास तुम्ही मत देऊन ती टेंडर्ड मतपत्रिका केंद्र अधिका-याकडे द्यावी ते तुमची मतपत्रिका स्वतंत्र पाकिटात ठेवतील. या घटनेत तुम्ही तुमचे मतदान मशीन मार्फत करू शकत नाही.
मतदाराला काेणत्याही उमेदवाराच्या बाबतीत सर्व माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. काेणाचा दबाव आणि लालूच यापासून दूर राहून आपले विचार पुर्वक मत देण्याचा अधिकार सर्व मतदारांना आहे. मतदानाची वेळ निश्चित असते. वेळ संपण्यापूर्वी जर मतदार हा मतदान केंद्राच्या रांगेत उभा असेल तर त्याला मतदान करण्याची अवश्य संधी मिळते. नियाेजित वेळेनंतर मतदान केंद्रावर येणा-यांना मत देण्याचा अधिकार असत नाही.
निवडणूक आयोगाची १०० टक्के मतदान व्हावी अशी भुमिका असते. मशीनवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमाेर मत द्या म्हणजेच “एक बाेट थेट वाेट”
आयाेगाने मतदारांसाठी प्रतिज्ञा ठरवून दिली आहे.
प्रतिज्ञा: “आम्ही भारताचे नागरिक लाेकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करताे की आपल्या देशाच्या लाेकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा काेणत्याही प्रलाेभणास बळी न पडता मतदान करू”
जागरूक नागरिक हाेऊ या
अभिमानाने मत देऊ या
माझे मत देऊन आले
निवड करून सरकार बनविले
मत ताकद आहे
मत देण्याचा आपला अधिकार
बदल्यात हाेऊ नका काेणाची शिकार
मत आहे आमचा अधिकार
कधीही करू नका त्याला बेकार
देशाचे भाग्यविधाते व्हा
मतदारांनाे, आता जागृत व्हा
– लेखन : रामचंद्र देठे
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी नांदेड,
(शासकीय यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त)
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800