नाशिक येथील कालिका मंदिर येथे श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब सेवानिवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा स्वागत समारंभ व त्यांनी लिहिलेल्या ‘समाजभुषण‘ या पुस्तकाचा नाशिक विभागीय प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, उद्योजकता अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा, विचार विनिमय, अनुभवांची देवाणघेवाण झाली. अतिशय उद्बोधक असा हा समाजभूषण संवाद उपस्थितांना अंर्तमुख करून गेला. याप्रसंगी देवेंद्र भुजबळ व विजय पवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विजय पवार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी नासिक, अशोक कुंदप, निवृत्त उप मुख्य दक्षता अधिकारी, दुग्धविकास विभाग मुंबई उपस्थित होते.
या संवाद उपक्रमात निवृत्त पोलीस उपअधीक्षक, श्री. मंडलेश्वर काळे, मध्यवर्ती मंडळ उपाध्यक्ष जयंत काळे, योगेश डीमके, सुभाष आढे, दिलिप कासार पंचवटी विभाग, अनिल हरदेकर सिडको विभाग, श्री सरोदे, श्री होते, योगेश कासार व कार्यकारिणी मंडळ सतिश असोदेकर, बाळासाहेब अंधारे, दिलीप वरशिंदकर, रितेश काळे, आनंद काळे, श्रीमती गीता अंबेकर व अश्विनी अंबेकर, राजेश अंबेकर , कासार समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते .🙏
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210703-WA0014-150x150.jpg)
– लेखन : विजय पवार.