हे देवी प्रेमळ आईवडील सासूसासरे
दिले आहेतच तू मला
सुखी निरोगी ठेव त्यांना
दिवाबत्ती करत वंदन करते तुला
समजुतदार जोडीदार
दिला आहेस तू मला
अखंड सौभाग्याचं वरदान दे
हळदीकुंकू वाहत वंदन करते तुला
गुणी जिवलग बहीण-दाजी दिर-जाऊ भाऊ ननंद
दिले आहे तर तू मला
यश कीर्तीचा सुगंध दरवळू दे
फळे फुले वाहत वंदन करते तुला
गोड गोंडस शुभ्र निरागस मुलगा मुलगी
दिले आहेत तू मला
औक्षवंत यशस्वी कर त्यांना
लाह्या बत्तासे वाहत वंदन करते तुला
जिवलग नातेवाईक मित्र-मैत्रिणी शेजारी
दिले आहे तर तू मला
कष्टाचे फळ मिळू दे सर्वांना
श्रीफळ वाहत वंदन करते तुला
हक्काचे घर व्यवसाय सर्वच
दिले आहेस तू मला
धनसंपत्ती सोबत सुख समाधान नांदू दे
धने साखर वाहत वंदन करते तुला
आणखी काही मागणं नाही
दिलं ते चिरंतन राहू दे आई
जन्मोजन्मी अशीच पूजा करण्याचे सामर्थ्य दे मला
मनापासून वंदन करते तुला 🙏

– रचना : वर्षा खेसे-जगताप