अमेरिकेतील लुईव्हील भागात सध्या पानांचे रंग बदलले आहेत, फॅाल सुरू आहे. त्या संदर्भातील ही निसर्ग कविता आपल्याला नक्कीच आवडेल…..
हिरव्या कंच कोमल पानाना
उमटती पिवळ्या लाल छटा
निसर्गही उधळी मूक्त रंगाना
पखरणीने सजल्या रानवाटा
वसंत सरूनी शिशिर आला जरी
नवपालवीची जाणीव बोथट तरी
उमलतील कोवळ्या मुग्ध कलिका
होइल सृष्टी सज्ज वसंत स्वागता
सरले आता जीवन तरी
रंग माझा वेगळा
पानगळ आता झाली तरी
आनंद देइन आगळा
निष्पर्ण आता होणार तरी
उमेद रूजलेली अंतरी
घेउन नवी जाणीव उरी
येइन पालवून चैत्रांतरी

– रचना : शिल्पा कुलकर्णी, लुईव्हील, अमेरिका.
शिल्पा कुलकर्णी यांच्या कवितेत जगण्याची नवी उमेद आहे..
.. प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
अतिशय सुंदर रचना शिल्पा कुलकर्णी